मुंबई - मुंबईमध्ये गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. त्यातच आता ओमायक्रॉन विषाणूचे (Omicron virus in maharashtra) रुग्ण आढळून येत आहेत. येत्या काही दिवसात ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर हे सण साजरे केले जाणार आहेत. यावेळी कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये, यासाठी पालिका दक्ष (BMC on Xtmas and Thirty First party) झाली आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेलमालक यांच्यावरही नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार कमी होत असताना नवीन व्हेरियंट (Omicron Corona new Variant) असलेल्या ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार रोखता यावा यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. ओमायक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी (Genome sequencing tests) केली जाणार आहे. यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका दक्ष -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून गेले पावणे दोन वर्ष मुंबईत कोरोना विषाणूच्या दोन लाटा येऊन गेल्या आहेत. या लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले असले तरी कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत मुंबईत ओमायक्रॉनचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन दक्ष आहे. गेल्या पावणे दोन वर्षात मुंबईकरांवर सर्वच सण साजरे करण्यावर निर्बध आहेत. आता ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर येत असून यावेळी गर्दी होऊन कोरोना तसेच ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये म्हणून पालिका दक्ष झाली आहे.
हे ही वाचा - Omicron Variant : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी मुंबई पालिकेचा अॅक्शन प्लान, पॉझिटीव्ह रुग्णांच्या होणार जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या
पालिका अॅक्शन मोडमध्ये -
३१ डिसेंबर, ख्रिसमससाठी पालिका अॅक्शन मोड मध्ये आली आहे. ३१ डिसेंबर आणि ख्रिसमसच्या पार्शवभूमीवर पालिका प्रशासनाकडून दक्षता बाळगली जाणार आहे. बंदिस्त सभागृह, बंदिस्त रेस्टॉरंट, हॉलमध्ये ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. मोकळ्या जागी २५ टक्के क्षमतेपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. यावेळी होणाऱ्या या पार्ट्यांवर नजर ठेवण्याकरता प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेची ४ पथके तैनात असतील. नियम मोडणाऱ्या पार्ट्या आढळल्यास संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेलमालक यांच्यावरही नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, अशी माहिती काकाणी यांनी दिली. कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.