ETV Bharat / city

Mumbai Metro three : मुंबई मेट्रो तीन ऑगस्टमध्ये दाखल होणार - अश्विनी भिडे

राज्यात नव्याने सत्तांतर होताच पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांची वर्णी मेट्रोमध्ये लावण्यात आली. आता त्यानंतर मेट्रोच्या कामानी वेग पकडला ( Metro Work picked up speed )आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबई मेट्रो तीनची पहिली प्रोटोटाइप ट्रेन येईल, असे अश्विनी भिडे म्हणाल्या आहेत. ई टीव्ही भारतला याबाबतची माहिती त्यांनी दिली.

Mumbai Metro three
मुंबई मेट्रो तीन
author img

By

Published : Jul 19, 2022, 11:01 AM IST

Updated : Jul 19, 2022, 12:01 PM IST

मुंबई - बऱ्याच काळापासून मेट्रो तीनची उत्सुकता जनतेला लागली होती. ती आता फलद्रूप होणार असे दिसते आहे. मुंबई महानगर रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनी भिडे ( Ashvini Bhide MD Of Metro ) यांनी ई टीव्ही भारतला याबाबतची माहिती दिली. येत्या ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबई मेट्रो तीनची ( Mumbai Metro 3 ) पहिली प्रोटोटाइप ट्रेन ( prototype train ) येईल, असे त्या म्हणाल्या.

Metro Work picked up speed
मेट्रोच्या कामांना वेग

मेट्रो कामांच्या प्रगतीचा आढावा - मुंबई महानगर रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनी भिडे यांनी मेट्रोच्या सारीपूत नगर स्थानक येथील ट्रेन वितरण क्षेत्रांची पाहणी केली आणि स्थानके, बोगदे व यंत्रणांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला ( Reviewed Metro work ). मेट्रो तीनच्या कामांची प्रगती संदर्भात आणि पाहणी संदर्भात ईटीव्ही शी बोलताना त्यांनी सर्व माहिती दिली. त्या म्हणाल्या कि '' मुंबई मेट्रो तीनची पहिली प्रोटोटाइप ट्रेन हि आगस्ट २०२२ मध्ये सुरु होईल. सुरुवातीच्या डिझाईनची क्षमता सिद्ध करणारी हि चाचणी बोगद्याच्या आत घेतली जाईल. जेणेकरून मेट्रोची क्षमता नीट पाहिली जाईल.'

Mumbai Metro 3
मुंबई मेट्रो तीन

विश्वासाला मेहनतीने न्याय देण्याचा प्रयत्न - मुंबई महानगर रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनीने भिडे यांनी बोगद्यासह ट्रेन रिसीव्हिंग सुविधेला भेट दिली आणि सहकाऱ्यांसोबत स्टेशन्सच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेट्रोच्या पुनर्नियुक्ती पदाबाबत आनंद व्यक्त केला. त्या पुढे म्हणाल्या, एमडी एमएमआरसीएल ( Mumbai Metropolitan Railway Corporation ) या पदावर माझी पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल अनेकांनी मला दिलेल्या आशीर्वाद आणि हार्दिक शुभेच्छांबद्दल मी अत्यंत आभारी आहे. त्यांचा माझ्यावर आणि आमच्या एमएमआरसीएल टीमवरील प्रेम आणि विश्वास आहे . ज्यामुळे आमची उर्जा आणि मनोबल वाढते. त्यांच्या विश्वासाला आमच्या मेहनतीने न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

मेट्रो कधी धावणार ? - मेट्रो मुंबईकरांच्या ( Mumbaikar ) सेवेत कधी दाखल होणार याबाबतची नेमकी तारीख मुंबई महानगर रेल्वे कॉर्पोरेशनच्या संचालिका अश्विनीने भिडे यांनी सांगितली नसल्याने त्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता ऑगस्ट २०२२ मध्ये मेट्रो कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान ट्रॅफिकने कंटाळलेल्या मुंबईकरांना ( traffic in Mumbai ) त्यामुळे दिलासा मिळणार आहे हे निश्चितच.

पुन्हा एकदा भिडे यांची वर्णी - फडणवीस सरकारच्या ( Fadnavis Government ) काळात मुंबई मेट्रोच्या कामाची जबाबदारी अश्विनी भिडे यांच्याकडे दिली होती. शिवसेना आणि अश्विनी भिडे यांच्यात आरे कारशेडच्या मुद्द्यावरून मतभेद झाले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi Government )सत्तेवर येताच भिडे यांची बदली करण्यात आली. कोरोना व्यवस्थापन आणि मुंबई महापालिका ( Mumbai Municipal Corporation ) अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती त्यांची नेमणूक केली होती. मात्र राज्यात नव्याने सत्तांतर होताच पुन्हा एकदा भिडे यांची वर्णी मेट्रोमध्ये लावण्यात आली आहे.

हेही वाचा - Attack On Nilesh Kokane In Nashik: नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकारी निलेश कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Last Updated : Jul 19, 2022, 12:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.