मुंबई - नुकताच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नव्या मेट्रो मार्गाची ( Mumbai Metro ) सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक नागरिक नव्या मेट्रोचा प्रवासाला सुरुवात केली आहे. दहिसरला राहणाऱ्या शिक्षिका शारदा परब आपल्या पतीसह पाहिल्यांदाच मेट्रो प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. 7 एप्रिल, 2022 ला दहिसरच्या ओवरीपाडा मेट्रो स्थानकांवर शारदा परब या पोहोचल्या तेव्हा गार्डनी त्याची बॅग तपासण्यासाठी सांगितले. परब यांनी आपली मौल्यवान बॅग स्कॅनिंग मशीनमध्ये तपासणीसाठी टाकली. मात्र, बॅग स्कॅनिंग मशीनमध्येच अडकली, ती बाहेर आली नाही. तेव्हा मेट्रोचा कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिल्यावर त्यांनी मशीन उघडून तात्काळ बॅग काढली. मात्र, तोपर्यंत शारदा परब यांची बॅग पूर्णपणे खराब झाली होती. पण, मेट्रोने त्यांना नवीकोरी बॅग भेट ( New Bag ) दिली आहे.
आयुष्यभर प्रसंग लक्षात राहणार - माझ्या फाटलेल्या बॅगे सारखीच हुबेहूब ती बॅग वाटल्यामुळे मी ही लगेच मेट्रोच्या अधिकाऱ्यांना होकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी दुपारच्या वेळेस माझ्या घरच्या पत्त्यावर ती बॅग आली. माझ्या तक्रारीची त्वरित निरसन करून हा सुखद अनुभव दिल्याबद्दल मेट्रो व्यवस्थापनाची मी मनापासून आभार मानते, अशी प्रतिक्रिया शिक्षिका शारदा परब यांनी दिली आहे. जीवनात आपल्या बरेच कटू गोड अनुभव येत असतात कटू अनुभवांमुळे मन खट्टू होत तर गोड अनुभव मनाला सुखावून जातात. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या मेट्रो वाहिनीच्या प्रवासादरम्यान आलेला असा एक वैयक्तिक अनुभव माझ्या आयुष्यभर लक्षात रहाणार आहे, असेही परब म्हटल्या.
हेही वाचा - Bully Bai Case : तीन आरोपींना बांद्रा न्यायालयाकडून जामीन मंजूर