ETV Bharat / city

मुंबईकरांसाठी खुशखबर.. 2022 मध्ये मेट्रो 2 ब आणि 4 होणार सुरू - मुंबई मेट्रो

कोरोना काळात मुंबईकरांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने आज मोठी खुशखबर दिली आहे. मेट्रो 2 अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गातील पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल, असे जाहीर करत दिलासा दिला आहे.

mumbai Metro
mumbai Metro
author img

By

Published : May 28, 2021, 8:30 PM IST

मुंबई - कोरोना काळात मुंबईकरांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने आज मोठी खुशखबर दिली आहे. मेट्रो 2 अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो 7 (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गातील पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल, असे जाहीर करत दिलासा दिला आहे. त्याचवेळी जानेवारी 2022 मध्ये मेट्रो 2 अ आणि 7 पूर्णपणे सेवेत दाखल होईल असे जाहीर केले आहे. तर या दोन मार्गापाठोपाठ 2022 मध्ये आणखी दोन मेट्रो मार्ग अर्थात मेट्रो 2 ब (डी एन नगर-वांद्रे-मंडाले) आणि मेट्रो 4 (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली) हे मार्ग ही सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस असल्याची माहिती आर ए राजीव, महानगर आयुक्त यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

मेट्रोच्या कामाला वेग -

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मेट्रो 1 (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) मार्ग सुरू करत मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. तर सद्या मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सिपझ), मेट्रो 2 अ, 2 ब, मेट्रो 4 आणि मेट्रो 6 चे काम सुरू असून या कामाला आता वेग दिला आहे. त्यानुसार मेट्रो 2 ब आणि 7 चे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. सोमवारी या दोन्ही मार्गावर मेट्रो गाड्यांची ट्रायल रन होणार आहे. ही ट्रायल रन झाल्यानंतर उर्वरित काम करत ऑक्टोबरमध्ये मेट्रो 2 अ मधील डहाणूकरवाडी ते आरे असा आणि मेट्रो 7 मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. तर दहिसर ते डी एन नगर आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असे संपूर्ण मार्ग जानेवारी 2022 मध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे राजीव यांनी सांगितले आहे. या दोन मार्गाचे काम सद्या वेगात सुरू असून उर्वरित मेट्रो मार्गच्या कामाला ही वेग दिला आहे.

मेट्रो 3 आणि 6 रखडणार?

मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे काम 90 टक्के पूर्ण झाले असून आता लवकरच हे मार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत. तर मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4 चे ही काम वेगात सुरू आहे. हे दोन्ही मार्ग 2022 अखेरीस पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. त्याचवेळी मेट्रो 6 ही 2022 मध्ये सुरू करण्याचा एमएमआरडीएचा विचार होता. पण मेट्रो 6 चे कारशेड हे कांजूर मार्ग येथे होणार आहे. जिथे हे कारशेड होणार त्याच जागेवर मेट्रो 3 चे कारशेड होणार असून ही जागा वादात अडकली आहे. हा वाद न्यायालयापर्यंत गेला आहे. हा वाद जोपर्यंत सुटत नाही, कामाला न्यायालयाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत काम सुरू होणार नाही. त्यामुळे 2022 मध्ये मेट्रो 6 मार्ग आम्हाला सुरू करता येणार नसल्याचेही राजीव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मेट्रो 3 ही न्यायालयाचा निकाल आल्याशिवाय मार्गी लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. असे असले तरी 2022 मध्ये मुंबईकरांसाठी एक-दोन नव्हे तर चार मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.