मुंबई -मागील तीन महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा बंद असल्याने खासगी वाहनातून प्रवास करत आहे. त्यामुळे मुंबईकरांना आर्थिक भुर्दड बसत असून प्रवासात तासोंतास जात आहे. प्रवासी संघटनी कोरोना लसीचा दोन मात्र घेणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवास खुला करण्याची मागणी केली होती. त्याचे पडसाद बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठीकीत सुद्धा दिसून आले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील, असे संकेत दिले आहे. त्यामुळे प्रवासी संघटनेने नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची मुभा द्या, अन्यथा येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवू, अशी भूमिका घेतली आहे.
दंडाची रक्कम खिशात ठेऊन करताहेत प्रवास-
मागील मे 2021 रोजी महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे पोटांचा प्रश्न सोडविण्यासाठी आज अनेक नागरिक नाईलाजास्तव दंडाचे पैसे खिशात घेऊन विनातिकिट प्रवास करत आहेत. आज एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असताना पुन्हा तिसरी लाट येईल, अशी नागरिकांना भीती दाखविण्यात येत आहे. आता अनेक क्षेत्रातील निर्बंध शिथिल झाले. त्यामुळे लोकल प्रवास करण्यासाठी नागरिकांना शिथिलता देणे आवश्यक आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसह खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याला लोकल प्रवासाची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे की, कोरोनाचे दोन डोस घेतले की त्याला कोरोना होत नाही. त्यामुळे कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास खुला करावी, अशी मागणी आम्ही अनेकदा राज्य शासनाकडे केली होती. मात्र, शासनाने यांची दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिक नाईलाजास्तव दंडाचे पैसे खिशात घेऊन विनातिकिट लोकल प्रवास करत आहे, अशी प्रतिक्रिया उपनगरीय प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली आहे.
सर्वसामान्य प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड
गेलं दीड वर्ष सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरीय लोकल रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो. त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोना संकटामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. राज्य सरकार याबाबत विचार करायला हवा. मात्र, शासनाकडून यांच्या विचार केला जात नसल्याचा आरोप आता सर्वसामान्य मुंबईकरांकडून केला जात आहे.
निवडणुकीत धडा शिकवण्याचा इशारा-
सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासात मुभा दिली तर कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढेल अशी धारणा शासनाची आहे. मात्र ज्या प्रवाशांनी कोरोनाचे दोन डोस घेतले त्यांना कोरोना होत नाही. यामुळे कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास खुला करावी अशी मागणी आहे. मात्र, यावर सुद्धा शासनाकडून दखल घेतली नाही. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा द्या, अन्यथा येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला धडा शिकवून अशी भूमिका आता आम्ही घेतली आहे, अशी माहितीही उपनगरीय प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली आहे.
निर्बंध कायम राहण्याचे संकेत -
कोरोना रुग्णसंख्या कमी झालेल्या भागांत दुकानांच्या वेळा वाढविण्यासह दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास खुला करावी अशी मागणीवर मंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याबाबाद चर्चा सुद्धा झाली असल्याचे कळत आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील असे संकेत दिले आहे. त्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्य लोकल प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.