नवी मुंबई: बुधवारी संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान ठाणे ते पनवेल या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी Women Beating झाल्याची घटना घडली होती. या घटनेत महिला पोलीस देखील जखमी female police officer injured झाले होते. याप्रकरणी वाशी पोलीस स्टेशनमध्ये Vashi Police Station गुन्हा देखील नोंद झाला होता, ही घटना सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाली होती. अखेर मारहाण करणाऱ्या महिलेलेला अटक करण्यात आली आहे.
लोकल ट्रेनमध्ये बसण्यावरून झाले होते भांडण बुधवारी संध्याकाळी पावणे आठच्या दरम्यान ठाणे ते पनवेल या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये ठाण्यावरून मायलेकी आणि नात या पनवेलचे दिशेने जात होते. यावेळी कोपरखैरणे इथे एक महिला चढली. जागेवर बसण्यावरून 3 महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.
सीटवर बसण्यावरून झालं भांडण बुधवारी 5 तारखेला ठाणे पनवेल लोकल ट्रेनमध्ये तुर्भे रेल्वे स्टेशन ते सिवूड रेल्वे स्टेशन दरम्यान मिडल महिला डब्यात 2 महिला प्रवाशी याच्यामध्ये सीटवर बसण्याच्या वादातून भांडण झाले होते. लोकल ट्रेनच्या डब्यातील इतर महिला प्रवाशी भांडण करणाऱ्या महिलांना भांडण करू नका, असे सांगत होते. परंतु ठाणे येथून बसलेल्या गुळनाथ जुबेर खान (50) आरजू तोहीत खान (30) या तळोजा येथे राहणाऱ्या मायलेकींनी कोपैखरणे रेल्वे स्टेशन येथून चढलेल्या महिला प्रवाशी स्नेहा ओंकार दिवडे (20) हिला मारहाण करू लागले.
महिला पोलिसांनी देखील केली मारहाण लोकल ट्रेनमध्ये एका महिलेला दोघी मायलेकी मारहाण करत असल्याचे डब्यातील इतर महिला प्रवाशी यांनी नेरुळ रेल्वे स्टेशन आल्यावर फलाट गस्तीवार असलेल्या पोलिसांना सांगितले. तात्काळ महिला पोलीस अंमलदार उगले आणि घाटकरी यांनी मारहाण करणाऱ्या महिला प्रवासी हिला समजावले भांडण तंटा करू नका, तक्रार असेलतर द्या, असे सांगु समज दिली. मात्र मारहाण करणारी प्रवासी महिला आरजू तोहीत खान हिने महिला पोलीस शारदा उगले यांना तुम्ही मध्ये का पडलात ? असे म्हणत त्यांच्या डोक्यात छोटीशी चिनिमातीची मारत त्यांना जखमी केले आहे.
अखेर मारहाण करणारी महिला अटक महिला प्रवासी व पोलीस अंमलदार शारदा उगले यांना मारहाण करणाऱ्या आरजू तोहीत खान (30) हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.