ETV Bharat / city

रविवारी पश्चिम-मध्य रेल्वे मार्गावर 36 तासांचा मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

author img

By

Published : Jan 8, 2022, 6:57 PM IST

मध्य रेल्वेचा हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी आणि बांद्रा डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. तर चुनाभट्टी व बांद्रा - छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/ वडाळा रोडवरून वाशी/बेलापुर/पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द असणार आहे.

रेल्वे मेगाब्लॉक
रेल्वे मेगाब्लॉक

मुंबई- उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी- रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार ( Mumbai local railways megablock ) आहेत. पश्चिम रेल्वेचा वसई रोड ते भायंदर स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर आणि हार्बर मार्गावरील छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस - चूनाभट्टी आणि बांद्रा डाउन हार्बर मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात ( local railway megablcok in Mumbai ) आलेला आहे.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेचा हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी आणि बांद्रा डाउन हार्बर मार्गावर ( CTS to Bandra down harbor local ) सकाळी 11.40 ते संध्याकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. तर चुनाभट्टी व बांद्रा - छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/ वडाळा रोडवरून वाशी/बेलापुर/पनवेलसाठी सुटणाऱ्या लोकल सेवा रद्द असणार आहे. याशिवाय छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यत बांद्रा/गोरेगांवसाठी सुटणाऱ्या सर्व डाउन हार्बर मार्गवरील लोकल सेवा रद्द ( megablock railway routes in Mumbai ) असणार आहे. या ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकरिता पनवेल आणि कुर्लावरून (प्लेटफॉर्म नंबर 8) विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.

हेही वाचा-Pune Metro Starts Soon : पुणेकरांच्या सेवेत लवकरच धावणार मेट्रो, जलदगतीने काम सुरु

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक-
पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी शनिवारी-रविवारी रात्री वसई रोड ते भाईंदर रेल्वे स्थानकाच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी-रविवारच्या रात्री 11.30 ते मध्य रात्री 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लाॅकवेळी अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल रद्द असणार आहे. रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

हेही वाचा-Earthquake at Koyna Dam : कोयना धरण परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का

36 तासांचा मेगाब्लॉक-
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेच्या नवीन टाकलेल्या रूळांचे (ट्रॅक) कट व कनेक्शन आणि क्रॉसओव्हर सुरू करण्यासाठी, मध्य रेल्वे ठाणे ते कळवा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गांवर 36 तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. हा मेगाब्लॉक शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून ते सोमवारी, मध्यरात्री 2 वाजेपर्यंत असणार आहे. परिणामी लोकल ट्रेन, मेल एक्स्प्रेसच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा-South Korea Election : वाचा .. राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांना 'का' मिळतोय टक्कल पडलेल्या लोकांचा पाठिंबा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.