ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट; 15 दिवसांत 1 लाख 34 हजार रुग्ण बरे - मुंबई कोरोना बातमी

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट झाली ( Mumbai Corona Cases Recover ) आहे. तसेच, गेल्या 15 दिवसांत 1 लाख 34 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर केवळ 1 ते 2 टक्के रुग्णांनाच आयसीयुची गरज भासत आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Jan 15, 2022, 10:45 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबरपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत ( Mumbai Corona Cases Increased ) होती. तीन दिवस रोज 20 हजारांवर रुग्णांची नोंद झाली. त्यात आता दिलासादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील रुग्णसंख्येत घट होत ( Mumbai Corona Cases Recover ) आहे. गेल्या 15 दिवसांत 1 लाख 34 हजार 671 रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबईत 10 हजार 661 रुग्णांची नोंद -

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या वाढत असल्याने तिसरी लाट आल्याची शक्यता ( Corona Third Wave Mumbai ) वर्तवण्यात आली होती. जानेवारी सुरु झाल्यानंतर तीन दिवस सलग 20 हजारांच्यावर रुग्णसंख्या आढळल्याने चिंता वाढली. मात्र, आता कोरोनाचा प्रसार कमी होत असून, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आज मुंबईत 10 हजार 661 रुग्णांची नोंद झाली तर, 21 हजार 474 रुग्ण कोरोना मुक्त झाले. 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान 1 लाख 34 हजार 671 रुग्ण बरे झाले आहेत.

2 टक्के रुग्णांना आयसीयुची गरज

मुंबईत रोज आढळणाऱ्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण लक्षणे विरहीत आहेत. 5 टक्क्यांना रुग्णालयाची तर 1 ते 2 टक्के रुग्णांना आयसीयुची गरज भासत आहे. बहुतेक रुग्ण चार ते पाच दिवसांत बरे होत आहेत. कोरोना संसर्गित रुग्णांना मोठ्या प्रमाणात डिस्चार्ज मिळत असल्याने बरे होणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या

1 जानेवारीला - 451
2 जानेवारीला - 578
3 जानेवारीला - 622
4 जानेवारीला - 654
5 जानेवारीला - 714
6 जानेवारीला - 2837
7 जानेवारीला - 8490
8 जानेवारीला - 6003
9 जानेवारीला - 8063
10 जानेवारीला - 27214
11 जानेवारीला - 14980
12 जानेवारीला - 14649
13 जानेवारीला - 20849
14 जानेवारीला - 22073
15 जानेवारीला - 21474

एकूण - 1 लाख 34 हजार 671

हेही वाचा - Maharashtra Corona Update : राज्यातआज 42 हजार 462 रुग्णांची नोंद, तर 23 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.