मुंबई - राज्य सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे ( DGP Sanjay Pande ) यांच्याविषयी आरोप असल्याने त्यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने ( Mumbai Highcourt Order On DGP Pitition ) याचिकाकर्त्यांना दिले आहे. पोलीस महासंचालक पदावर कायमस्वरुपी नियुक्ती होण्यात दिरंगाई होत असल्याने राज्य सरकारविरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले.
पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी -
महाराष्ट्रासाठी कायमस्वरुपी पोलीस महासंचालक नेमण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान यापूर्वीचा राखून ठेवण्यात आलेला निर्णय मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने रद्द केला. पांडे यांना प्रतिवादी केल्यानंतर त्यांना याचिकेवर गुरुवारपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश आणि त्याविषयी याचिकादारांना प्रत्युत्तरासाठी शुक्रवारपर्यंत मुदत देऊन पुढील सुनावणी ठेवली 7 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे हायकोर्टाने म्हटले. तसेच राज्य सरकारलाही प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याची मुभा कोर्टाने दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
हेही वाचा - Bjp Mla Suspension quashes : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड - देवेंद्र फडणवीस