ETV Bharat / city

Money Laundering Case : आनंदराव अडसूळांना दिलासा नाही; अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ ( Shiv Sena Leader Anandrao Adsul ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका आज (शुक्रवार) मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) फेटाळून लावली आहे. सक्तवसुली संचालनालयाने ( Directorate of Enforcement ) आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ( Money Laundering Case ) गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ
शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ
author img

By

Published : Dec 3, 2021, 3:14 PM IST

मुंबई - सिटी सहकारी बँक गैरव्यवहार ( City Cooperative Bank Misconduct Case ) प्रकरणात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ ( Shiv Sena Leader Anandrao Adsul ) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका आज (शुक्रवार) मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) फेटाळून लावली आहे. सक्तवसुली संचालनालयाने ( Directorate of Enforcement ) आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ( Money Laundering Case ) गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या प्रकरणी ईडीने अनेकवेळा धाडी टाकल्या आहेत. आनंदराव अडसूळ यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अडसूळ यांनी ईडीची कारवाई टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी उच्च न्यायालयाने त्यांना कोणतीही सवलत न देता मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अडसूळ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. त्यात अटकपूर्व जामीन अर्जावर जोवर सुनावणी पूर्ण होत नाही, तोवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज केला होता. तेव्हा अर्ज देखील न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज पुन्हा अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ यांचा अर्ज फेटाळून लावल्याने आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

  • काय आहे प्रकरण?

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवले होते. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ईडीने त्यांना ताब्यात घेतले. आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली. पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

हेही वाचा - Saamna Editorial On China : चीनची युद्धाची खुमखुमी जीरवण्यासाठी भारताने आता रणनिती आखायलाच हवी - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.