ETV Bharat / city

मेट्रो 7 वरील दिंडोशी स्थानकाचे नामांतर वाद; याचिकाकर्त्यांना सुनावणी पूर्वी 1 लाख रुपये जमा करण्याचे न्यायालयाचे निर्देश

author img

By

Published : Jun 9, 2022, 8:58 PM IST

दिंडोशी हा परिसर या मेट्रो स्थानकापासून साधारणत दीड किलोमीटर लांब आहे. त्यामुळे प्रवाशांची दिशाभूल आणि गैरसोय होऊ शकते, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. गुरुवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी याचिकाकर्त्यांना एक लाख रुपये अनामत रक्कम भरण्याचे निर्देश दिले आणि सुनावणी तहकूब केली.

mumbai High Court
mumbai High Court

मुंबई - मेट्रो कांजुर कारशेडचा वाद अद्यापही मिटला नसताना आता पुन्हा नवीन मेट्रो संदर्भातील वाद समोर आला आहे. पश्चिम उपनगरातील मेट्रो 7 वरील दिंडोशी स्थानकाचे नामांतराचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. दिंडोशी स्थानकाचे नामांतराचा नावाला विरोध असल्याने सेवाभावी संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्याला 1 लाख रुपये डिपॉझिट करण्याचे निर्देश दिले असून त्यानंतर याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल, असे निर्देश आज ( गुरुवारी ) मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी दिले आहे.

दिंडोशी हा परिसर या मेट्रो स्थानकापासून साधारणत दीड किलोमीटर लांब आहे. त्यामुळे प्रवाशांची दिशाभूल आणि गैरसोय होऊ शकते, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. गुरुवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी याचिकाकर्त्यांना एक लाख रुपये अनामत रक्कम भरण्याचे निर्देश दिले आणि सुनावणी तहकूब केली. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व यादरम्यान मेट्रो7 चे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून एमएमआरडीए सुरू आहे. या मार्गावरील मालाड पूर्व येथील स्थानकाला दिंडोशी नाव दिलेले आहे. याविरोधात नई रोशनी या सामाजिक संस्थेने न्यायालयात जनहित याचिका केली आहे. मात्र याचिकेवर सुनावणी घेण्यापूर्वी एक लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

सन 2010 मध्ये केंद्र सरकारने मालाड येथील मेट्रो स्थानकाला पठाणवाडी नाव देण्याचे निश्चित केले होते. येथील पठाणवाडी परिसरावरून हे नाव दिले होते. मात्र दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीए आयुक्तांनी राजकीय दबावापोटी स्थानकाचे नाव दिंडोशी केले असा दावा याचिकेत केला आहे. एमएमआरडीच्या नियमानुसार एखाद्या परिसरात दोन मेट्रो स्थानके असतील तर दुसऱ्या ठिकाणी त्या परिसरातील ऐतिहासिक किंवा अतिपरिचित नाव स्थानकाला द्यायला हवे. मेट्रो 2 मध्ये मालाड स्थानक असल्यामुळे मालाड पूर्व येथील मेट्रो 7 च्या स्थानकाला पठाणवाडी हे परिसरातील परिचित नाव देण्याचे निश्चित करण्यात आले होते. याशिवाय येथे असलेल्या एका उड्डाण पुलाला देखील पठाणवाडी नावाने ओळखले जाते. त्यामुळे मेट्रो स्थानकाला पठाणवाडी असे नाव द्यावे, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.

हेही वाचा - कंडक्टरकडून प्रवाशांना पाणी! हरियाणात सुरेंद्र शर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.