ETV Bharat / city

Nawab Malik in ED Custody : नवाब मलिक कोठडीत असताना अवमानतेची कारवाई कशी करणार? मुंबई उच्च न्यायालयाचा वानखेडेंना प्रश्न - Nawab Malik in ED Custody

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे ( Sameer Wankhede father plea in court ) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये चुकून समीर वानखेडे असे भाषांतर केल्याने ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली ( Sameer Wankhede translation in court ) आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मलिक यांच्या विरोधात सतत बदनामी केल्याचा आरोप करत अवमान याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी करण्यात आली.

नवाब मलिक ज्ञानदेव वानखेडे
नवाब मलिक ज्ञानदेव वानखेडे
author img

By

Published : Feb 28, 2022, 3:08 PM IST

मुंबई- समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर आज सुनावणी ( Dnyandev Wankhede plea ) होणार होती. मात्र, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik in ED custody ) सध्या ईडीच्या कोठडीमध्ये आहेत. अशा परिस्थितीत नवाब मलिकांवर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई कशी काय करणार? असा प्रश्न विचारत मुंबई उच्च न्यायालयाने एक आठवड्यासाठी सुनावणी ( Mumbai high court hearing ) तहकूब केली आहे.

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे ( Sameer Wankhede father plea in court ) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये चुकून समीर वानखेडे असे भाषांतर केल्याने ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली ( Sameer Wankhede translation in court ) आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मलिक यांच्या विरोधात सतत बदनामी केल्याचा आरोप करत अवमान याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी करण्यात आली. मात्र, मलिक हे कोठडीत असल्याने एक आठवण्यासाठी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

हेही वाचा-Indian Students in Ukraine : बेलगोरोड मार्गाने विद्यार्थ्यांना बाहेर काढावे, पवार-जयशंकर यांच्यात चर्चा, मोदी चार केंद्रिय मंत्री युक्रेन शेजारील देशात पाठवणार

नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेला उत्तर देण्यासाठी वेळ दिला. न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने सांगितले, की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे नवाब मलिक हे ज्ञानदेव वानखेडेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामधून मलिक यांना काय साध्य करायचे आहे? हे अविरत चालू राहणे योग्य नाही. अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. मलिक यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यांनी म्हटले की, मी कुठल्याही प्रकारची वानखेडे यांची बदनामी करत नाही. त्यासंदर्भात बोलण्याचा अधिकार मला आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले होते.

हेही वाचा-Malegaon BombBlast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार फितूर

नवाब मलिक यांची वानखडे कुटुंबांवर टीका

आर्यन खान प्रकरणानंतर मुंबई एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे समीर वानखेडे कुटुंबांवर सातत्याने आरोप करत होते. त्यानंतर समीर वानखडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कुठल्याही प्रकारचे वानखडे कुटुंबियांवर वक्तव्य करणार नाही, अशी मुंबई उच्च न्यायालयाला हमी दिली होती. तरीदेखील नवाब मलिक यांनी वानखडे कुटुंबांवर टीका केली.

मलिक यांच्याकडून दंड वसुल करण्याची मागणी-

एकप्रकारे मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे याचिका ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी करताना न्यायालयाने नवाब मलिक यांना फटकारले आहे. 28 डिसेंबर, 2 आणि 3 जानेवारी रोजी मलिकांनी पुन्हा वानखेडेंबाबत विधाने करत बदनामी केल्याचा दावा वानखेडे यांनी याचिकेतून केला आहे. त्यामुळे मलिक यांच्यावर न्यायालयाचा वारंवार अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी. तसेच याचिकेच्या खर्चाची रक्कम दंड म्हणून वसूल करावा, अशी मागणी वानखेडे यांनी या याचिकेतून केली आहे.

वानखेडेच्या जातप्रमाणपत्राबाबत सध्या जातपडताळणी कमिटीकडे सुनावणी सुरू आहे. त्याबाबतही नवाब मलिकांची सोशल मीडियावर, मीडियात टिका टिप्पणी सुरूच राहिली होती. आहे. दिलेली हमी मोडत वानखेडेंबाबत अनावधानाने वक्तव्य केल्याबद्दल नवाब मलिकांनी न्यायालयाची माफीही मागितली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.