ETV Bharat / city

HC on non custodial parent : मुलांना आई-वडीलांसह आजी-आजोबांचे प्रेम मिळण्याचा अधिकार -मुंबई उच्च न्यायालय

न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने ( Justice Anuja Prabhudessai ) बुधवारी महत्त्वपूर्ण आदेश दिला. या आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध करून देण्यात आली. न्यायमूर्तींनी नमूद केले की, नॉन-कस्टोडिअल पालकांना ( judge non custodial parent ) मुलांसमवेत दर्जेदार वेळ घालवण्याचा आणि त्यांच्या सहवासाचा आनंद घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही.

मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Apr 14, 2022, 7:34 PM IST

मुंबई - मुलांना आई-वडील आणि आजी-आजोबा या सर्वांचे प्रेम आणि वात्सल्य मिळण्याचा ( HC order on children right ) अधिकार आहे. हे त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी आणि आरोग्यासाठी हे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) निरीक्षण नोंदविले. पुण्यातील एका पालकांना मुलांना भेटण्यासाठी मंजूरी देताना मुंबई उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदविले आहे.

न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने ( Justice Anuja Prabhudessai ) बुधवारी महत्त्वपूर्ण आदेश दिला. या आदेशाची प्रत गुरुवारी उपलब्ध करून देण्यात आली. न्यायमूर्तींनी नमूद केले की, नॉन-कस्टोडिअल पालकांना ( judge non custodial parent ) मुलांसमवेत दर्जेदार वेळ घालवण्याचा आणि त्यांच्या सहवासाचा आनंद घेण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही.

मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी दोघेही आवश्यक- मुलांना आई-वडील आणि आजी-आजोबा दोघांचेही प्रेम आणि वात्सल्य मिळण्याचा ( HC order on children right ) अधिकार आहे. हे त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी आणि आरोग्यासाठी हे आवश्यक आहे, असल्याचे न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी म्हटले आहे.

मुलांची आई भेटू देत नसल्याची तक्रार- न्यायालयात एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. जून 2020 पासून आपल्या मुलांकडे जाण्याची परवानगी मिळत नसल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयात म्हटले होते. याचिकाकर्त्याचे वकील अजिंक्य उडाणे ( petitions advocate Ajinkya Udane ) यांनी न्यायालयाला सांगितले की मुलांचे आजोबा आजारी आहेत. त्यामुळे त्यांना मुलांना भेटण्याची इच्छा होती.

एकविचार तोडगा काढावा- मार्च 2022 मध्ये उच्च न्यायालयाने आदेश देऊनही मुलांची आई त्यांच्या वाढदिवसालाही भेटू देत नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने मुलांना भेटण्याकरिता याचिकाकर्त्याला दोन दिवसांची परवानगी दिली आहे. दोन्ही जोडप्यांनी मध्यस्थीने प्रश्न सोडून एकविचाराने तोडगा काढण्याचेही न्यायालयाने सूचविले आहे.

हेही वाचा-2 soldiers killed in accident : जम्मू काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या वाहनाचा अपघात; 2 जवान ठार, 4 गंभीर जखमी
हेही वाचा-encounter started in Shopian : शोपियानमध्ये सैन्यदलाची दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू, चार दहशतवादी ठार

हेही वाचा-Lion Jackal Video in Zoo : कमला नेहरु पार्कमध्ये शिकार करताना सिंहाची दमछाक; चपळ कोल्ह्याने 'असा' दिला चकवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.