मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर Ex Home Minister Anil Deshmukh Bail Petition आज मुंबई उच्च न्यायालयात Mumbai High Court सुनावणी होणार होती. मात्र आज खंडपीठ बसले नसल्याने आज सुनावणी होऊ शकली नाही. ईडीच्या वतीने युक्तिवाद करण्यात येणार होता. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अनिल देशमुख Ed Arrested Ex Home Minister Anil Deshmukh In Money Laundering Case यांना 12 तासाच्या चौकशीनंतर अटक केली होती.
देशमुख वाढलेले वय आणि आजारपणामुळे द्या जामीन अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर Anil Deshmukh Bail Petition मागील सुनावणी दरम्यान वरिष्ठ वकील विक्रम चौधरी यांनी अनिल देशमुख Ex Home Minister Anil Deshmukh यांचे वाढते वय आणि त्यांना असलेल्या आजारामुळे न्यायालयाने Mumbai High Court वैद्यकीय कारणाच्या आधारे जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती केली होती. मात्र ईडीच्या वकिलांकडून याला विरोध दर्शवण्यात आला होता.
जनरल अनिल सिंग यांनी जामीन अर्जाला केला विरोध देशमुखांची याचिका पीएमएलए न्यायालयाने Prevention of Money Laundering Act यापूर्वी फेटाळली आहे. पीएमएलएच्या दुहेरी अटी लागू झाल्यानंतर जामिनावर सोडण्यासाठी समाधानकारक कारणे द्यावी लागतील. त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर जामीन याचिका केली आहे. तुरुंगात कैद्यांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा मिळत असून अनिल देशमुखांचाही Ex Home Minister Anil Deshmukh त्यात समावेश आहे. मधुमेह, रक्तदाब हे सामान्य आजार आहेत. ज्यावर कोठेही उपचार होऊ शकतात. त्यामुळे जर आरोपींचा आजार चिंताकारक असेल, तर वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज करणे अपेक्षित असल्याचे सांगत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी जामीन अर्जाला विरोध केला होता.
अद्याप मिळाली नाही सुनावणीची पुढील तारीख माजी गृहमंत्री अनिल देशमुख Ex Home Minister Anil Deshmukh यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र आज खंडपीठ बसले नसल्याने आज सुनावणी होऊ शकली नाही. अद्याप सुनावणीची पुढील तारीख मिळाली नाही, असे अनिल देशमुख Ex Home Minister Anil Deshmukh यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे.
काय आहे प्रकरण? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग Ex Mumbai Cp Param Bir Singh यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ncp chief sharad pawar यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख Ex Home Minister Anil Deshmukh यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी Ex Home Minister Anil Deshmukh सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुली टार्गेट दिले होते असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग Ex Mumbai Cp Param Bir Singh यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच अनिल देशमुख Ex Home Minister Anil Deshmukh यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे.