ETV Bharat / city

INS Vikrant fraud Case: आयएनएस विक्रांत प्रकरण; सोमैया पिता पुत्राला मुंबई उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा 14 जूनपर्यंत कायम - किरीट सोमैया संजय राऊत वाद

किरीट सोमैया यांच्याविरोधात आयएनएस घोटाळ्याप्रकरणी ( INS Vikrant Case ) मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये, यासाठी सोमैया यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आज झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने किरीट सोमैया यांच्यासह त्यांचे पूत्र निल सोमैया यांना 14 जूनपर्यंत अंतरिम दिलासा ( Interim Bail to Kirit Somaiya ) दिला आहे.

INS Vikrant fraud Case
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 28, 2022, 1:57 PM IST

मुंबई - उच्च न्यायालयाने किरीट सोमैया यांच्यासह त्यांचे पूत्र निल सोमैया यांना 14 जूनपर्यंत अंतरिम दिलासा ( Interim Bail to Kirit Somaiya ) दिला आहे. सरकारी वकिलांनी काही दिवस सोमैया पिता-पूत्रांना चौकशीसाठी बोलवता यावे, यासाठी कोर्टाची परवानगी मागितली. त्यावर गरज लागल्यास पोलिसांनी चौकशीसाठी बोलवावे, असे कोर्टाने सांगत परवानगी दिली. पुढील सुनावणी 14 जून रोजी मुंबई उच्च न्यायालय करणार आहे.

काय आहे आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरण - भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर आयएनएस विक्रांत ( INS Vikrant Case ) निधी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. किरीट सोमैया यांच्याविरोधात आयएनएस घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये, यासाठी सोमैया यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दि. 12 एप्रिलला मंजूर केला ( Interim Bail to Kirit Somaiya ) होता. आज किरीट सोमैया न्यायालयात हजर झाले असता, त्यांना न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जून रोजी मुंबई उच्च न्यायालय करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.