मुंबई : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर कंगानाने इन्स्टाग्रामवर शीख समुदायाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यासंदर्भात मुंबईत गुन्हा दाखल झाला होता या विरोधात तीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली या प्रकरणात आज सोमवारी न्यायालयाने 24 जानेवारीपर्यंत कंगनावर कारवाई करण्यात येउ नयेत असे आदेश दिले आहेत. कंगनाच्या पोस्टनंतर 23 नोव्हेंबर रोजी मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आज या प्रकरणाची सुनावणी झाली, यात मुंबई उच्च न्यायालयाने तिच्यावर 24 जानेवारी पर्यंत कुठलीही कारवाई करण्यात येऊ नये असे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण
कंगना रणौतने शेतकरी आंदोलन शीख समुदायावर खलिस्तान संदर्भातील वादग्रस्त पोस्ट इंस्टाग्रामवर केली होती. त्या पोस्टवरुन कंगनावर भारतीय दंड संहिता कलम 295 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगनाने चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचा दावा करत अधिकारांचे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करावे यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. अॅड.रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली असून त्यांनी कलम 295 अ अंतर्गत हे प्रकरण येऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. संविधानाच्या कलम 19 (1) (अ) अनुसार आपल्या मूलभूत हक्कांच्या अंतर्गत कृषी कायदे रद्द करण्यात आले त्यावर मत व्यक्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात तिच्या विरोधात गुन्हे दाखल करत तिच्यावर टीका देखील करण्यात झाली होती.
Bombay HC Relief To Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा - Bollywood Actress Kangana Ranaut
शेतकरी आंदोलनाच्या वेळी ( Actress Kangana Ranaut On Farmers Agitation ) केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणात ( Kangana Controversial Post On Farmers ) मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court On Kangana Ranaut ) अभिनेत्री कंगना रनौतला ( Bollywood Actress Kangana Ranaut ) थोडासा दिलासा दिला आहे. तीच्यावर 24 जानेवारी पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असे आदेश दिले आहेत. दाखल असलेले गुन्हे रद्द करण्यात यावेत यासाठी तीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.