ETV Bharat / city

Comfort To Rahul Gandhi कांग्रेसचे नेते राहुल गांधी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा कायम

author img

By

Published : Jul 11, 2022, 7:30 PM IST

राफेल विमान खरेदी प्रकरणात ( Rafale deal controversy ) पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्यावर 'चौकीदार चोर है' अशी टीका केल्यामुळे दाखल मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader, Rahul Gandhi) यांनी केलेल्या याचिकेवर आज न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी दरम्यान राहुल गांधी यांना 28 जुलै पर्यंत दिलासा कायम ठेवत (Mumbai High Court comfort remains) कुठलीही कारवाई करू नये असे निर्देश गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाला देण्यात आले आहेत.

Comfort To Rahul Gandhi
राहुल गांधी यांना दिलासा

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनवणी दरम्यान दोन्हीही पक्षकारांकडून कोणीही उपस्थित नसल्याने या याचिकेवर पुढील सुनावणी करिता तारीख देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी 28 जुलै पर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. तसेच 28 जुलै पर्यंत राहुल गांधींना दिलेला दिलासा कायम ठेवत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये असे निर्देश गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाला देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप कार्यकर्त्याने गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

हजर राहण्याचे आदेश : तक्रारी नंतर गिरगाव न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावत प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात राहुल यांनी हायकोर्टात धाव घेतली. महेश श्रीमल यांनी मानहानीची तक्रार केली आहे. ही तक्रार रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज राहुल गांधी यांनी वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे. राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत साल 2019 मध्ये मानहानीचा खटला दाखल झाला. या दाव्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेले आहेत.

वादग्रस्त टीका केल्याचा आरोप: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्या प्रकरणातील दाव्यावर फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले होते. याप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर या पुर्वीची सुनावणी झाली त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा देत पुढील सुनावणी तहकूब केली होती.

मोदींची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप: राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर 'कमांडर इन थीफ, चौकीदार चोर है, चोरो का सरदार' अशी टीका केली होती. यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टीची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपाचे कार्यकर्ते महेश श्रीमाळ यांनी ही तक्रार दाखल केली होती. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या वक्तव्यांचा या याचिकेत समावेश आहे. तक्रारदार भाजपाचे सदस्य असल्यामुळे ते अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असे मत व्यक्त करत गिरगाव दंडाधिकारी कोर्टाने राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केले होते. याशिवाय राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत.

काय आहे प्रकरण : 20 सप्टेंबर 2018 रोजी जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी 'गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है', असा नारा दिला होता. तसेच 24 सप्टेंबरला एक ट्वीट करून राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक मानहानीकारक विधान करत भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन केल्याचा दावा, या तक्रारीतून करण्यात आला आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत, असे विधान करुन राहुल गांधींनी भाजपाच्या कार्यकर्त्यांचाही अपमान केला आहे, असा दावा या याचिकेत करण्यात आलेला आहे.

हेही वाचा : Sharad Pawar : वसंतरावं नाईक यांच्यामुळे मला आमदारकी लढवता आली - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.