मुंबई : शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांना शिंदे सरकारने झटका ( Shinde government's blow to Raut ) दिला आहे. व्यवसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर गठित करण्यात आलेली एसआयटी ( SIT investigation closed ) तपास बंद करण्यात आल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयामध्ये ( Mumbai High court ) बुधवारी मुंबई पोलिसांकडून झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी केला आरोप : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दक्षिण मुंबईतल्या व्यावसायिक जितेंद्र नवलानीवर ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून वसुली रॅकेट चालविण्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी करण्याकरिता मुंबई पोलिसांची विशेष टीम एसआयटी गठित करण्यात आली होती. नवलानी आणि ईडीचे तीन अधिकारी व्यावसायिकांकडून वसुली रॅकेट चालवीत असल्याचा आरोपांची चौकशी करीत होती. मात्र, मंगळवारी ही एसआयटी चौकशी बंद करण्यात आली आहे. आरोपी जितेंद्र नवलानी यांच्यावर याच प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोने मे महिन्यात गुन्हा दाखल केला आहे असे म्हटले गेले आहे.
न्यायालयाकडून एसआयटी तपास बंद : या संदर्भात नवलानी आणि ईडीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान एसआयटी तपास बंद करण्यासंदर्भात मुंबई पोलिसांतर्फे माहिती देण्यात आली आहे. वर्ष 2015 ते 2021 दरम्यान नवलानी यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करीत जवळपास 58.96 कोटी रुपये अनके व्यापाऱ्यांकडून वसूल केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता.
कोण आहेत जितेंद्र नवलानी : संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र नवलानी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. ईडीकडे येणाऱ्या प्रकरणातील वसुली एजंट, असे राऊतांनी नवलानींचे वर्णन केले होते. या आधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत नवलानी यांचे नाव पहिल्यांदा जोडले गेले होते. परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय असल्यामुळे याच गुन्ह्यातून नवलानी यांचे नाव हटवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारदार पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी केला होता. परंतु, आपण तसे करण्यास नकार दिला, त्यावेळी आपली बदली करण्यात आली आणि नंतर ही बदली रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांच्या वतीने दोन कोटींची लाच मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणावरून परमबीर सिंह आणि रेस्टॉरंट बार मालकांचे जवळचे संबंध असल्याचा आरोपही झाला होता.
काय आहे प्रकरण : 23 नोव्हेंबर 2019 च्या रात्री जितेंद्र नवलानी यांचा वाढदिवस होता. हा वाढदिवस ते डर्टी बन्स या स्वत:च्या मालकीच्या रेस्टॉरंट अँड बारमध्ये आपल्या मित्रपरिवारासोबत साजरा करीत होते. रात्रीचे दोन वाजले तरी हॉटेल सुरूच असल्यामुळे रात्रपाळीवर असलेले अनुप डांगे बार बंद करण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्यांची तिथं बातचीत सुरू असताना अचानक तेथील लिफ्टमध्ये काहीजणांत हाणामारी सुरू झाली. या मारामारीमध्ये काही महिलांसह सहा जणांचा समावेश होता. एफआयआरमध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार रोहन, योहान साची मेकर, इसराम मुन्नार यांच्यात हाणामारी सुरू होती. ती सोडवण्यासाठी अनुप डांगे मध्ये पडले असता त्या महिलेनं डांगे यांना शिविगाळ करीत त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये डांगे यांचा युनिफॉर्म फाटला. तेथेच उपस्थित असलेल्या संतोष जहांगीर याने अचानक मधे घुसत हाणामारीला सुरुवात केली. यावेळी डांगे यांनाही मार लागला. त्यानंतर जितेंद्र नवलानी यांनी मध्ये पडत सर्वांना तेथून बाजूला केले आणि निघून जाण्यास सांगितले. मात्र, डांगे जहांगीर याला पकडण्यासाठी पुढे सरसावले त्यावेळी नवलानी यांनी त्यांना अडवलं आणि जहांगीरला तिथून पळून जाण्यास मदत केली, असा पोलिसांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला.
जितेंद्र नवलानी यांना क्लीन चिट : गुन्हा दाखल झालेल्यांपैकी रोहन आणि योहान यांना त्या रात्रीच पोलिसांनी जागेवर जामीन मंजूर केला. साची मेकर आणि इसराम मुन्नार यांना कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर फरार संतोष जहांगीर उर्फ सत्याला नंतर अटक करण्यात आली. मात्र, त्यालाही कोर्टाने जामीन मंजूर केला होता. 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे जितेंद्र नवलानी यांनी गुन्हा रद्द करण्याऐवजी दोषमुक्तीची याचिका दाखल करायला हवी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अरुणा पै कामत यांनी उच्च न्यायालयात केला. मात्र, एप्रिल 2020 मध्ये पोलीस उपायुक्तांनी दाखल केलेल्या अहवालात या संपूर्ण प्रकरणात जितेंद्र नवलानी यांना क्लीन चीट देण्यात आल्याचा दाखला त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील आभात पोंडा यांनी उच्च न्यायालयात केला आहे.
हेही वाचा : Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पदभार स्वीकारणार
हेही वाचा : Bail warrant against Sanjay Rau : खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट, 'हे' आहे प्रकरण