ETV Bharat / city

Mumbai HC on Nawab Malik : नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले.. 10 डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश - मुंबई उच्च न्यायालयाची नवाब मलिकांना नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मनाई केल्यानंतरही नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडे कुटूंबियावर (Wankhede Defamation case) टीका केल्याने न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना सवाल केला आहे की, त्यांच्याविरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नोटीस का जारी करू नये. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी न्यायालयाने नवाब मलिक (Mumbai HC on Nawab Malik) यांना 10 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

Wankhede Defamation case
Wankhede Defamation case
author img

By

Published : Dec 7, 2021, 7:15 PM IST

मुंबई - मुंबई NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयाचा अवमान याचिका दाखल (Wankhede Defamation case) केली होती. यावर आज मंगळवार (दि.07) रोजी सुनवणी झाली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नवाब मलिक यांना फटकारले असून 10 डिसेंबरपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर (Mumbai HC on Nawab Malik ) करण्याचे सांगितले आहे. न्यायालयाने मनाई केली असतानाही मंत्री मलिक यांनी पुन्हा एकदा वानखडे यांच्यावर टीका केली आहे. यामुळे आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले असल्याची चर्चा सुरु आहे.

नवाब मलिकांचे वकील माहिती देताना

वानखडे यांच्या वकिलांनी मलिक यांना ३ डिसेंबर रोजी फेसबुकवर केलेली पोस्ट पुरावा (Wankhede Defamation case) म्हणून सादर केली. यावर नवाब मलिक हे मंत्री म्हणून बोलत आहेत, की वैयक्तिक हे कळायला हवं असे म्हणत न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे. (Bombay HC issued notice to Nawab Malik) मलिक जर वैयक्तिक बोलत असतील तर त्यांना कोर्टात बोलवावं लागेल, असंही न्यायमूर्तींनी (Mumbai High Court) स्पष्ट केलं आहे.

  • Bombay HC issued notice to Nawab Malik&asked him to file an affidavit that why action should not be taken against him for "wilfully breaching" its earlier orders, in regard to statements against Dnyandev Wankhede & family despite giving an undertaking in court that he won't do it pic.twitter.com/ALRcTp1ErT

    — ANI (@ANI) December 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
चैत्यभूमीवर ६ डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीही नवाब मलिकांनी वानखडे यांना अनुसरून भाष्य केल्याचा युक्तीवाद वानखडेंच्या वकिलांनी केला आहे. यावर मलिक यांच्या वकिलांनी ते वक्तव्य मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते या नात्याने केल्याचे न्यायालयात सांगितले आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांना अनुसरून मुंबई उच्च न्यायालयाला हमी देऊनही त्याचे उल्लघंन केले आहे. त्यामुळे न्यायालयाने तुमच्यावर का कारवाई करू नये, अशी विचारणा करत त्यांना त्यांचे मत प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्यास सांगितले आहे. हे आदेश न्यायमूर्ती काथावाला यांच्या खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भातील पुढील सुनावणी शुक्रवारी १० डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.