ETV Bharat / city

राज्यातील अपघात २५ टक्क्यांनी वाढले; सर्वाधिक अपघात मुंबईत - महाराष्ट्र रस्ते अपघात बातमी

गेल्यावर्षीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यात राज्यात अपघातांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. तर या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे.

accident
अपघात
author img

By

Published : Jul 28, 2021, 4:54 AM IST

मुंबई - राज्यातील रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राज्यातील अपघातांची संख्या कमी होत नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत गेल्या सहा महिन्यात राज्यात अपघातांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. तर या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सर्वाधिक अपघात हे मुंबईत झाले आहेत. यामुळे मुंबईतील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...

हेही वाचा - महाबळेश्वरने अनुभवला सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस

राज्यात २ हजार ७६४ अपघात वाढले -

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत अपघातांच्या संख्येत २५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जानेवारी ते जून २०२० या काळात राज्यात एकूण ११ हजार ४८१ अपघात झाले होते. त्यात जानेवारी ते जून २०२१ या काळात १४ हजार २४५ पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदा २ हजार ७६४ अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच या अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही यावर्षी वाढली आहे. राज्यात गेल्यावर्षी एकूण ५ हजार २०९ अपघाती मृत्यू झाले होते. त्यात यंदा ६ हजार ७०८ इतकी वाढ झाली आहे. यंदा अपघातांमध्ये जखमी झालेल्या प्रवाशांचा आकडा १० हजारांपार गेला आहे. गेल्यावर्षी ९ हजार ६४१ प्रवासी अपघातांमध्ये जखमी झाले होते. यंदा त्यांची संख्या १० हजार ८७९ इतकी झाली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून मिळाली आहे.

मुंबईत अपघात वाढले -

मुंबईत गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांची संख्या ८०९ वरून ९५६ पर्यंत वाढली आहे. मात्र, अपघातांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण मुंबईत १४१ वरून १३१ पर्यंत घटले आहे. याशिवाय अपघातांमध्ये जखमी होण्याचे प्रमाणही ८२२ प्रवाशांवरून ८०९ पर्यंत कमी झाले आहे. या व्यतिरिक्त नाशिक ७२८, अहमदनगर ६७५, पुणे ६७४, कोल्हापूर ५१४, सोलापूर ४५३, नागपूर ४३१, नागपूर (शहर) ४२४, जळगाव ४१८ आणि नांदेड ३९६ या जिल्हात सर्वाधिक अपघात झाले आहेत.

सर्वाधिक अपघाती मृत्यू 'या' जिल्हात -

राज्यात गेल्यावर्षी एकूण ५ हजार २०९ अपघाती मृत्यू झाले होते. यंदा ६ हजार ७०८ इतकी वाढ झाली आहे. अपघाती मृत्यूंमध्ये वाढ झालेल्या जिल्ह्यामध्ये नाशिकचा पहिला क्रमांक लागतो. नाशिकमध्ये ४५४, पुणे ४१८, अहमदनगर ३६७, जळगाव २७६, सोलापूर २५५, सातारा २४७, नागूपर (ग्रामीण) २४२, औरंगाबाद २०४, बीड १९७ आणि कोल्हापूरमध्ये १९२ अपघाती मृत्यू झाले आहेत.

हेही वाचा - बसवराज बोम्माई यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.