ETV Bharat / city

Twist In MCA Elections : मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीत पुन्हा नवा ट्विस्ट - cricket association election

Twist In MCA Elections: ज्यात आधी महाविकास आघाडी सरकार स्थापन Maha Vikas Aghadi Govt झाले होते. त्यानंतर शिवसेना फुटली आणि शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. या साऱ्या घडामोडी धक्कादायक आणि जनतेला आश्चर्यचकीत करणाऱ्या होते. अगदी त्याचप्रमाणे मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतही धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत.

Twist In MCA Elections
Twist In MCA Elections
author img

By

Published : Oct 14, 2022, 10:02 PM IST

मुंबई: राज्यात आधी महाविकास आघाडी सरकार स्थापन Maha Vikas Aghadi Govt झाले होते. त्यानंतर शिवसेना फुटली आणि शिंदे- फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. या साऱ्या घडामोडी धक्कादायक आणि जनतेला आश्चर्यचकीत करणाऱ्या होते. अगदी त्याचप्रमाणे मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतही धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. सर्वात प्रथम शरद पवार गटाकडून माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संदीप पाटील अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी पवार यांची पॉवर पाठीमागे असल्याने संदीप पाटीलच आता मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान होणार असे साऱ्यांना वाटत होते.

मात्र एकदिवस अचानक शरद पवार हे आशिष शेलार यांच्या मालिकेच्या क्बलकडून मतदान करणार आणि शरद पवार आणि आशिष शेलार हे गट मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी एकत्र आले असल्याची बातमी धडकली. आणि साऱ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर लगेचच भाजपा आमदार आशिष शेलार यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि आता भाजपाचाच अध्यक्ष मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षस्थानी विराजमान होणार, असे साऱ्यांना पक्के वाटू लागले. मात्र अजून बरच नाट्य बाकी होतं.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे पुन्हा एकदा या साऱ्या रंगतदार घडामोडींमध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. आशिष शेलार यांनी बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदासाठी अर्ज भरला आणि जशी एखाद्या विकेटने किंवा बॅटसमनच्या खेळीने मॅच फिरते, तशी निवडणूक फिरताना दिसली. आशिष शेलार यांनी आज मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला आणि पवार- शेलार पॅनलकडून अमोल काळे यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज भरला. यामुळे आता अध्यक्षपदासाठी संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे असा हा सामना रंगणार आहे. अमोल काळे यांनी आधी उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता.

हा सामना रंगतदार होणार असंच चित्र निर्माण झाले मात्र तो त्यांना मागे घेतला आणि मुंबई क्रिकेट ग्रुपकडूनही नवीन शेट्टी यांनी उपाध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला. यामुळे आता उपाध्यक्षपदासाठी आता एकही उमेदवार रिंगणात नाही. अमोल काळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. यामुळे आता संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे हा सामना रंगतदार होणार असंच चित्र निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे पवार-शेलार पॅनलचे दीपक पाटील हे जॉईंट सेक्रेटरी पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. तर मुंबई प्रिमीयर लीग टी-२० चेअरमनपदी विहंग सरनाईक हेदेखील बिनविरोध निवडून येण्याच्या मार्गावर आहेत. विहंग सरनाईक देखील पवार शेलार गटाचे उमेदवार आहेत.

टी-२० च्या चेअरमपदी बिनविरोध निवडून येण्याची शक्यता नियमाप्रमाणे दोन पदांवर राहत येत नाही. म्हणून MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज आज मी मागे घेतला आहे. आमच्या पॅनलकडून अमोल काळे हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवतील. तर शरद पवार- आशिष शेलार पॅनलच्या विजयाची मालिका सुरु झाली आहे. दीपक पाटील हे आमच्या पॅनलचे उमेदवार जॉईंट सेक्रेटरी पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. पवार- शेलार पॅनलसाठी ही सुवार्ता आहे. विहंग सरनाईक हे देखील मुंबई प्रिमीयर लीग टी-२० च्या चेअरमपदी बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे, असे आशिष शेलार यांनी आपला अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सादर केलेला अर्ज मागे घेतल्यानंतर सांगितले. दरम्यान मुंबई क्रिकेट संघटनेत जवळपास सारेच पक्ष एकाच पॅनलकडून लढत असल्याबाबत विचारले असता, आशिष शेलार म्हणाले की क्रिकेटमध्ये एकच पक्ष असतो जंटलमन आणि अनजंटलमन हा जंटलमन लोकांचा गेम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.