मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण (Hanuman Chalisa Controversy) करण्याची घोषणा करत अमरावतीहून मुंबईत धडकलेले आमदार रवी (MLA Ravi Rana) राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत (Rana Couple Judicial Custody) आहे. दरम्यान, कोठडीत पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली, तसेच मागासवर्गीय असल्याने रात्रभर पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा (Navneet Rana Allegation on Police) यांनी केला होता. याबाबतचे पत्रच त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (MP Navneet Rana Letter to Om Birla) यांना लिहिले आहे. याबाबत राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश ओम बिर्ला यांनी दिले होते. या सर्व प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्तयांनी राणा दाम्पत्यांना पोलीस चहापाणी देत असल्याचा व्हिडिओ शेअर (Mumbai CP Share Rana Video) केला आहे.
राणा दाम्पत्य न्यायालयीन कोठडीत - हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्य आणि शिवसैनिकांमध्ये मुंबईत जोरदार खडाजंगी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा लक्षात घेत राणा दाम्पत्याने माघार घेतली. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने विविध कलमांखाली गुन्हा दाखल करत पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
नवनीत राणा यांचे ओम बिर्लांना पत्र - खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र लिहिले आह. या पत्रात पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मला २३ एप्रिल रोजी खार पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. संपूर्ण रात्र मी तिथे होते. यादरम्यान, तहान लागल्याने मी पिण्यासाठी पाणी मागितले होते. पण, ते दिले नाही. मी मागासवर्गीय असल्याने इतरजण वापरत असलेल्या ग्लासमधून तुम्हाला पाणी देता येणार नाही, असे ड्युटीवरच्या पोलिसांनी मला सांगितले. हा प्रकार माझ्यासाठी धक्कादायक होता. मला बाथरूमही वापरू दिले नाही. जातीवरून हिणवत माझा छळ करण्यात आला. मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली,' असा दावा नवनीत राणा यांनी पत्रात केला आहे.
हेही वाचा - Rana Attempt's For Bail : राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच, आता शुक्रवारी सुनावणी
लोकसभा सचिवालयाचे महाराष्ट्र सरकारला आदेश - खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवल्यानंतर केंद्र अॅक्शन मोडमध्ये आले आहे. लोकसभेने राज्यातील महाआघाडी सरकारला २४ तासात या प्रकरणाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राणा यांनी याबाबतचा ईमेल ओम बिर्ला यांना पाठवला होता. यावर लोकसभा सचिवालयाने महाराष्ट्र सरकारला २४ तासांचा वेळ दिला आहे. याचबरोबर लोकसभेच्या हक्कभंग समितीने नवनीत राणा यांना बेकायदा अटक केल्याप्रकरणी २४ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची प्रतिक्रिया - नवनीत राणा यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. नवनीत राणा ( Dilip Walse Patil on Navneet rana jail treatment ) यांनी केलेल्या आरोपांमध्ये वस्तुस्थिती असल्याचे वाटत नाही, असे ते म्हणाले. याबाबतची परिपूर्ण माहिती लोकसभा अध्यक्षांना लवकरात लवकर दिली जाईल, असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई पोलीस आयुक्तांकडून व्हिडिओ जारी - नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांना मुंबई पोलिसांनी व्हिडिओ शेअर करत उत्तर दिले आहे. पोलीस स्थानकात बसलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) हे चहा पीत असल्याचा व्हिडिओ मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांनी ट्विट केला आहे. त्यांच्यासमोर पाण्याची बाटलीही असल्याचे या व्हिड़िओत दिसत आहे.
-
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022
व्हिडिओचा अन् नवनीत राणांच्या तक्रारीचा संबंध नाही - पोलीस आयुक्त संजय पांडेंनी जारी केलेला सीसीटीव्ही व्हिडिओ हा खार पोलीस ठाण्यातील आहे. त्यानंतर राणांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आले. त्यामुळे या व्हिडिओचा आणि नवनीत राणांनी केलेल्या तक्रारीचा काहीही संबंध नसल्याचा दावा नवनीत राणा यांचे वकील रिजवान मर्चेंट यांनी केला आहे.