मुंबई मुंबईत गेल्या अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार कमी झाला असून काल शंभरच्या खाली रुग्ण संख्या नोंद झाली होती. आज त्यात वाढ होऊन १२० रुग्णांची नोंद झाली आहे. ( Coronavirus Cases in Mumbai Today ) आज एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. सध्या ९६३ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोनाचे १२० नवे रुग्ण मुंबईत आज २० सप्टेंबरला ५१८८ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२० रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. १९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ( Mumbai Corona Cases ) आतापर्यंत एकूण ११ लाख ४९ हजार २३५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २८ हजार ५७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९३६ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५६६१ दिवस इतका आहे. ( Corona Update ) मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ( Mumbai Corona Cases ) गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१३ टक्के इतका आहे.
रुग्णसंख्या घटत मुंबईत गेल्या दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेच्या दरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० वर गेली आहे. ( Corona Update ) जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४, ४ सप्टेंबरला ३७६, ५ सप्टेंबरला १७३, ६ सप्टेंबरला २८५, ७ सप्टेंबरला ३१६, ८ सप्टेंबरला २९०, ९ सप्टेंबरला २५१, १० सप्टेंबरला २०९, ११ सप्टेंबरला १८७, १२ सप्टेंबरला १२८, १३ सप्टेंबरला १९३, १४ सप्टेंबरला २०३, १५ सप्टेंबरला १३८, १६ सप्टेंबरला १५९, १७ सप्टेंबरला १४६, १८ सप्टेंबरला १०४, १९ सप्टेंबरला ६६, २० सप्टेंबरला १२० रुग्णांची नोंद झाली आहे.
१२४ वेळा शून्य मृत्यूची नोंद मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १२४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च ( Corona Update ) महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ५ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.