ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी ११६० नव्या रुग्णांची नोंद, तर १० जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jan 30, 2022, 7:23 PM IST

Updated : Jan 30, 2022, 7:42 PM IST

सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस १८०० च्यावर रुग्ण आढळून आले. त्यात आणखी घट होऊन गुरुवारी आणि शुक्रवारी १३०० च्या वर रुग्ण आढळून आले. शनिवारी त्यात किंचित वाढ होऊन १४११ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज (रविवारी) त्यात घट होऊन ११६० रुग्णांची नोंद झाली ( 1160 New Corona Patients Registered January 31 ) आहे. तर आज १० मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या १० हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट ( Third Wave of Corona Virus in Mumbai ) आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस १८०० च्यावर रुग्ण आढळून आले. त्यात आणखी घट होऊन गुरुवारी आणि शुक्रवारी १३०० च्या वर रुग्ण आढळून आले. शनिवारी त्यात किंचित वाढ होऊन १४११ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज (रविवारी) त्यात घट होऊन ११६० रुग्णांची नोंद झाली ( 1160 New Corona Patients Registered January 31 ) आहे. तर आज १० मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या १० हजार ७९७ सक्रिय रुग्ण आहेत.

  • ११६० नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (31 जानेवारीला) ११६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १० मृत्यूची नोंद झाली आहे. आज २५३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ४५ हजार ६३० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख १५ हजार ४५१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६१२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १०७९७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३७५ दिवस इतका आहे. मुंबईमधील ८ इमारती सील आहेत. २३ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.१८ टक्के इतका आहे.

  • ९३ टक्के बेड रिक्त

मुंबईत आज आढळून आलेल्या ११६० रुग्णांपैकी १००९ म्हणजेच ८७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १६० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २९ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,५७३ बेडस असून त्यापैकी २२६८ बेडवर म्हणजेच ६ टक्के बेडव रुग्ण आहेत. इतर ९४ टक्के बेड रिक्त आहेत.

  • रुग्णसंख्येत चढ-उतार

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात वाढ हाऊ लागली. ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१, ८ जानेवारीला २०,३१८, त्यानंतर रुग्णसंख्या घटली असून ९ जानेवारीला १९४७४, १० जानेवारीला १३६४८, ११ जानेवारीला ११६४७, १२ जानेवारीला १६४२०, १३ जानेवारीला १३७०२, १४ जानेवारीला ११३१७, १५ जानेवारीला १०६६१, १६ जानेवारीला ७८९५, १७ जानेवारीला ५९५६, १८ जानेवारीला ६१४९, १९ जानेवारीला ६०३२, २० जानेवारीला ५७०८, २१ जानेवारीला ५००८, २२ जानेवारीला ३५६८, २३ जानेवारीला २५५०, २४ जानेवारीला १८५७, २५ जानेवारीला १८१५, २६ जानेवारीला १८५८, २७ जानेवारीला १३८४, २८ जानेवारीला १३१२, २९ जानेवारीला १४११, ३० जानेवारीला ११६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

  • नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

  • धारावीत ३ नवे रुग्ण

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज ३० जानेवारीला ३ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८५९१ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ८१४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या ३३ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा - Nagpur Municipal Corporation : महानगरपालिकेच्या विशेष सभेत काँग्रेस नगरसेवकाने सोडले सिगारेटचे झुरके

Last Updated : Jan 30, 2022, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.