ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत पुन्हा होतेय वाढ; रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के - mumbai corona latest news

मुंबईत सोमवारी ९६० कोरोना रुग्ण आढळले होते. तर काल मंगळवारी ८०३ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन ११२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद ( Mumbai Corona Update ) झाली. तर आज १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असून ८१५८ सक्रिय रुग्ण आहेत.

Mumbai Corona Update
मुंबईत रुग्णसंख्या वाढली
author img

By

Published : Feb 2, 2022, 7:16 PM IST

Updated : Feb 2, 2022, 7:29 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. मागील आठवड्यात सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस १८०० च्या वर रुग्ण आढळून आले. त्यात घट होऊन सोमवारी ९६० तर काल मंगळवारी ८०३ रुग्णांची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन ११२८ नव्या रुग्णांची नोंद ( Mumbai Corona Update ) झाली. आज १० मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के असून ८१५८ सक्रिय रुग्ण आहेत.

  • ११२८ नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (२ फेब्रुवारीला) ११२८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १० मृत्यूची नोंद झाली आहे. आज १८३८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ४८ हजार ५२१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख २० हजार ९२६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ८१५८ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५७० दिवस इतका आहे. मुंबईमधील ४ इमारती सील आहेत. २६ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.१२ टक्के इतका आहे.

  • ९.१ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या ११२८ रुग्णांपैकी ९९३ म्हणजेच ८८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १०८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २५ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,१८५ बेडस असून त्यापैकी १९५३ बेडवर म्हणजेच ५.३ टक्के बेडव रुग्ण आहेत. इतर ९४.७ टक्के बेड रिक्त आहेत.

  • नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

  • धारावीत ४ नवे रुग्ण -

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली. ७ जानेवारीला १५० तर ८ जानेवारीला १४७ सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत गेली. आज २ फेब्रुवारीला ४ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ८६०१ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ८१६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या २३ सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा - Nitesh Rane Arrested : नितेश राणे यांना अटक, दोन दिवसांची पोलीस कोठडी

Last Updated : Feb 2, 2022, 7:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.