मुंबई - मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ( The Third Wave of Corona Virus ) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in Patients ) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात दोन दिवस वाढ होऊन बुधवारी ७३ तर गुरुवारी ५६ रुग्ण आढळून आले. त्यानंतर काल त्यात किंचित घट होऊन ४४ तर आज शनिवारी ( दि. १६ एप्रिल ) ४३ नव्या रुग्णांची नोंद झाली ( Corona Positive Patients Find Out in Mumbai ) आहे. आज शून्य मृत्यूची नोंद ( Zero Deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ३२९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients in Mumbai ) आहेत.
मुंबईत ९९ टक्के बेड रिक्त - मुंबईत आज शनिवारी ४३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५८ हजार ७१० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३८ हजार ८१९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२९ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients in Mumbai ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५ हजार १८७ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ४३ रुग्णांपैकी ४२ म्हणजेच ९८ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार १४३ बेड्स असून त्यापैकी १५ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्के बेड रिक्त आहेत.
रुग्णासंख्येत चढउतार - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३ रुग्णांची नोंद झाली आहे.
५८ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर, २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ५८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली ( Zero Deaths ) आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा तर एप्रिल महिन्यात १३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.