ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबईत फक्त २८५ कोरोना रुग्णांची नोंद तर शून्य मृत्यू - मुंबईत सध्या २५४० सक्रिय रुग्ण

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सध्या घटत आहे. (Mumbai Corona Update) मुंबईत २८५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत आज शून्य मृत्यू नोंदले गेले. मुंबईत सध्या २५४० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Sep 6, 2022, 7:21 PM IST

मुंबई - मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार आता कमी होत आहे. आज २८५ रुग्णांची नोंद झाली आहे (285 patients zero deaths reported today). मुंबईत आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे (Mumbai Corona Update). सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या २५४० सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

२८५ नवे कोरोना रुग्ण - मुंबईत आज ६ सप्टेंबरला ५०४६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात २८५ रुग्णांची नोंद झाली. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ५१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४६ हजार ७२५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २४ हजार ४७४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५५० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी २०९४ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०३४ टक्के इतका आहे.

कोरोना रुग्णसंख्या घटतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली. यात ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४,
४ सप्टेंबरला ३७६, ५ सप्टेंबरला १७३, ६ सप्टेंबरला २८५ रुग्णांची नोंद झाली आहे.

१२० वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १२० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात १ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.