मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( The third wave of corona virus ) आटोक्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in patients ) होऊन गेले काही दिवस ५० आत व नंतर १०० वर रुग्ण आढळून येत होते. काल आणि आज सलग दोन दिवस रुग्णसंख्या २०० च्या नोंदवली गेली आहे. आज शुक्रवारी २१३ नव्या रुग्णांची ( 213 new Corona patients ) तर शून्य मृत्यूची नोंद ( deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे ( Mumbai Corona Update ) होण्याचा दर ९८ टक्के असून ११४४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
२१३ नवे रुग्ण : मुंबईत आज शुक्रवारी २१३ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ६२ हजार ४७६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४१ हजार ७६६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ११४४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४६९३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१४ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या २१३ रुग्णांपैकी २०४ म्हणजेच ९६ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ५१० बेड्स असून त्यापैकी ३७ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्याहुन अधिक बेड रिक्त आहेत.
रुग्णसंख्या वाढतेय : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली आहे. ३ मे ला १००, ४ मे ला ११७, ५ मे ला १३०, ६ मे ला ११७, ७ मे ला १७२, ८ मे ला १२३, ९ मे ला ६३, १० मे ला १२२, ११ मे ला १२४, १२ मे ला १३९, १३ मे ला १५५, १४ मे ला १३१, १५ मे ला १५१, १७ मे ला १५८, १८ मे ला १९४, १९ मे ला २२३, २० मे ला २१३ रुग्णांची नोंद झाली आहे.
८८ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ८८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा तर मे महिन्यात १७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा - Rani Baug Mumbai : राणीबागेत पर्यटकांची गर्दी वाढली; राणीबाग रोज खुली ठेवण्याची पर्यटकांची मागणी