मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन मागील २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७ तर, आज २ मार्चला १०० रुग्णांची नोंद झाली आहे. आज सलग सहाव्या दिवशी शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण २० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ६८९ सक्रिय रुग्ण आहेत.
१०० नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.
मुंबईत आज (२ मार्च) १०० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज १६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार ६४९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३६ हजार ३८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १६ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ६८९ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर, रुग्ण दुपटीचा कालावधी ५४०५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत, झोपडपट्टी सील नाही. २३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे.
-
Mumbai reports 100 fresh #COVID19 cases, 168 recoveries and zero deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) March 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Active cases 689 pic.twitter.com/6Zodx5E1aN
">Mumbai reports 100 fresh #COVID19 cases, 168 recoveries and zero deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) March 2, 2022
Active cases 689 pic.twitter.com/6Zodx5E1aNMumbai reports 100 fresh #COVID19 cases, 168 recoveries and zero deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) March 2, 2022
Active cases 689 pic.twitter.com/6Zodx5E1aN
९८.१ टक्के बेड रिक्त -
मुंबईत आज आढळून आलेल्या १०० रुग्णांपैकी ८७ म्हणजेच, ८७ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. २ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३५ हजार ८२८ बेड असून त्यापैकी ६७९ बेडवर म्हणजेच, १.९ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९८.१ टक्के बेड रिक्त आहेत.
२० वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण २० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर, मार्च महिन्यात २ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा - IPL 2022 Updates : आयपीएलच्या पंधराव्या पर्वासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर