ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी रुग्णांची नोंद, ३१ नवे रुग्ण, शून्य मृत्यू - मुंबई कोरोना आकडेवारी 12 मार्च

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट (Corona Third Wave) आली. तिसऱ्या लाटेत जानेवारीत २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर घट होऊन गेले काही दिवस १००च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत 31 नवे रुग्ण (Mumbai New Corona Cases) आढळून आले आहेत.

mumbai corona
मुंबई कोरोना
author img

By

Published : Mar 12, 2022, 8:47 PM IST

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोना विषाणूची तिसरी लाट आली. तिसऱ्या लाटेत जानेवारीत २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर घट होऊन गेले काही दिवस १००च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या २ वर्षातील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. आज ३१ रुग्ण आढळून (Mumbai Corona Update) आले असून शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के (Corona Recovery Cases) असून ३४७ सक्रिय रुग्ण आहेत.

  • ३१ नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत आज (१२ मार्च) ३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५७ हजार २१९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार २९६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३४७ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२,०८८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ५ ते ११ मार्च या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे.

  • ९९.४ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या ३१ रुग्णांपैकी २५ म्हणजेच ८१ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. १ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये २८,५३९ बेडस असून त्यापैकी १८३ बेडवर म्हणजेच ०.६ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.४ टक्के बेड रिक्त आहेत.

  • असे झाले रुग्ण कमी -

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३१ रुग्णांची नोंद झाली आहे.

  • २९ वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण २९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात ११ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

  • धारावीत शून्य रुग्ण -

धारावीत आज शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आतापर्यंत एकूण ८६५० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८२३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीत सध्या १ सक्रिय रुग्ण आहेत. धारावीत दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर धारावी हॉटस्पॉट झाली होती. मात्र धारावी मॉडेल आणि केलेल्या उपाययोजना, नागरिकांची साथ यामुळे धारावीत अनेकवेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मागील वर्षांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु आहे. मुंबईत ९९ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. लसीकरणाला होणारी गर्दी कमी होऊ लागली आहे. यामुळे सध्या सुरु असलेल्या लसीकरण केंद्रापैकी १२५ लसीकरण केंद्र बंद केली जाणार आहेत अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

  • १२५ लसीकरण केंद्र बंद करणार -

मुंबईमध्ये मार्च २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. काही दिवसात कोरोनाचा प्रसार वाढल्याने देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. कोरोनाचा प्रसार कमी होत असतानाच १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. गेल्या वर्षभरातून अधिक काळ लसीकरण मोहीम सुरु आहे. मुंबईमधील पात्र लाभार्थ्यांपैकी ११० टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर ९९ टक्के नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे ३५१ लसीकरण केंद्रांपैकी १२५ लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. बंद करण्यात येणाऱ्या लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ शाळा, काॅलेज, गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या लसीकरण कॅम्पवर तैनात करण्यात येतील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

  • मनुष्यबळ इतर ठिकाणी वापरणार -

मुंबई महापालिका, शासकीय तसेच खासगी अशा एकूण ३५१ लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जात आहे. मुंबईमधील पात्र १ कोटी ६१ लाख ६ हजार ७६२ लाभार्थ्यांना लसीचा पहिला तर ९३ लाख ३५ हजार ११४ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीचा ११० टक्के तर ९९ टक्के नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी लाभार्थी येत नाही, अशा ठिकाणची १२५ लसीकरण केंद्र बंद करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणची लसीकरण केंद्र बंद करण्यात येतील त्या ठिकाणचे साहित्य मनुष्यबळ हे मोबाईल व्हॅन, ज्या ठिकाणी लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात येत आहेत, त्या ठिकाणी वापरण्यात येईल, असे काकाणी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.