ETV Bharat / city

Mumbai Mayor On Corona : मुंबई डेंजर झोनच्या बाहेर, मात्र काळजी घ्या - किशोरी पेडणेकर

मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ( Mumbai Corona Cases Increased ) वाढत आहे. त्या पार्श्वभुमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीकेसी कोविड सेंटरची ( Kishori Pednekar Visit Bkc Covid Center ) पाहणी केली. यावेळी नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

mayor kishori pednekar
किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Jan 8, 2022, 2:17 PM IST

Updated : Jan 8, 2022, 4:03 PM IST

मुंबई : मुंबईत मागील महिन्यापासून रुग्णसंख्येत प्रचंड ( Mumbai Corona Cases Increased ) वाढ झाली. गेल्या दोन दिवसांपासून 20 हजारांच्या वर रुग्णसंख्या आढळत असल्याने चिंतेत भर पडली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. 20 हजार रुग्ण सापडले असले तरी ते लक्षणे विरहीत आहेत, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर ( Mayor Kishori Pednekar On Corona ) यांनी दिली. बीकेसीतील कोविड सेंटरची त्यांनी ( Kishori Pednekar Visit Bkc Covid Center ) पाहणी केली. त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "ग्राऊंड रिअॅलिटीची माहिती घेण्यासाठी बीकेसीत आले. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. बीकेसीत 2 हजार 500 बेड आहेत. त्यातील 1 हजार 300 बेड विना ऑक्सिजन तर 890 ऑक्सिजन वाले आहेत. येथील आयसीयुत एकही कोरोना रुग्ण नाही. 20 हजार रुग्ण सापडले आहेत त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. मी पहिल्यापासून घाबरवलेले नाही. मात्र, काळजी घ्या. लक्षणे विरहीत रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे बेड रिक्त असल्याने आपण डेंजर झोनमध्ये नाही."

महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीकेसी कोविड सेंटरचा आढावा घेतला

यावेळी पेडणेकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. "गर्दी वाढत असून, नागरिकांना उकसवण्याचे काम केले जात आहे. आम्ही कधीच म्हणालो नाही आहे लॉकडाऊन होणार. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करुन त्यांना उकसवण्याचे काम विरोधक करत आहे."

वैचारिक मतभेद असले तरी...

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याबाबात विचारले असता त्यांनी ( Kishori Pednekar On Ashish Shelar Threatened ) सांगितले की, "विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात वैचारिक मतभेद असले तरी कोणी जीवावर उठू नये. त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणे चुकीचे असून, महाराष्ट्रात चुकीची संस्कृती वाढू नये. आशिष शेलार यांना धमकी येत असेल तर ते चुकीचे आहे. विकृतांनी हे थांबवावे. याप्रकरणी मी स्वत: पोलीस आयुक्तांशी बोलणार असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली."

हेही वाचा - Danve Mahajan Corona Positive : रावसाहेब दानवे आणि गिरीष महाजन कोरोनाग्रस्त

Last Updated : Jan 8, 2022, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.