ETV Bharat / city

भाजपावाल्यांकडून पंतप्रधानांची दाढी कुरवळण्याचे काम; भाई जगताप यांचा भाजपाला टोला

author img

By

Published : Jun 3, 2021, 8:12 PM IST

काँग्रेसने वॉर्डांची पुनर्रचना करून आपल्या सध्याच्या ३० जागा वाचवून दाखवावे, असे खुले आव्हान भाजपाने दिले आहे. त्यावर प्रतित्यूर देताना भाजपाने आपल्या ८४ जागा टीकवून दाखवावे, असे प्रतिआव्हान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी दिले आहे.

bhai jagtap critisize bjp on bmc election
भाजपावाल्यांकडून पंतप्रधानांची दाढी कुरवळण्याचे काम; भाई जगताप यांचा भाजपाला टोला

मुंबई - मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होऊ घातली आहे. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. काँग्रेसने वॉर्डांची पुनर्रचना करून आपल्या सध्याच्या ३० जागा वाचवून दाखवावे, असे खुले आव्हान भाजपाने दिले आहे. त्यावर प्रतित्यूर देताना भाजपाने आपल्या ८४ जागा टीकवून दाखवावे, असे प्रतिआव्हान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी दिले आहे. तसेच भाजपावाल्यांनी कोरोनाच्या काळात नागरिकांसाठी काहीही न करता पंतप्रधानांची दाढी कुरवळण्याचे काम केल्याची गंभीर टीकाही जगताप यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

सीमांकन प्रश्न पंतप्रधानांच्या लहरी पणासारखा नाही -

मुंबईमधील नालेसफाईची पाहणी आज भाई जगताप यांनी पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा, काँग्रेसचे उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या उपस्थितीत केली. या पाहणीनंतर भाजपाने काँग्रेसला दिलेल्या आव्हानाबाबत जगताप बोलत होते. यावेळी बोलताना भाजपच्या आव्हानाला मी काही प्रतिआव्हान करणार नाही. मी जेव्हा काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष झालो तेव्हाच भाजपाचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबईमधील ८४ जागा टीकवून दाखवावेत, असे आवाहन केले आहे. आमच्या ३० जागांची तुम्ही चिंता करण्याचे कारण नाही, असे जगताप म्हणाले. वॉर्ड पुनर्रचना हा कायदेशीर मुद्दा आहे. भाजपाने आपल्या फायद्याकरिता अनेक गोष्टी केल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती दिली आहे. ४५ वॉर्ड पेक्षा अधिक वॉर्ड असे आहेत, त्याचे सीमांकन अयोग्य पद्धतीने केले आहे. आम्हाला सर्व २२७ वॉर्डचे सीमांकन करण्यास सांगितले जात आहे. मग तुम्ही सर्व जागांचे सीमांकन का केले नाही, असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला. सीमांकन हा प्रश्न देशाच्या पंतप्रधानांच्या लहरी पणासारखा नाही. फडणवीस यांनी लहरी पणा केला, असा टोलाही जगताप यांनी लगावला.

भाजपा, फडणवीस यांच्यावर टीका -

भाजपावाल्यांनी आव्हानाची भाषा केली आहे. आम्हाला आव्हानाची भाषा करण्याची गरज नाही. मुंबईतील नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उचलताना गेल्या सव्वा वर्षात भाजपचे कोण दिसले का, देवेंद्र फडणवीस दिसले का, असा प्रश्न जगताप यांनी उपस्थित केला आहे. ज्याच्यावर रेमडेसिवीरची चोरी केल्याचा गुजरातमध्ये गुन्हा दाखल आहे. त्याला वाचवण्यासाठी ते बीकेसी पोलीस ठाण्यात गेल्याचे सर्वांनी पाहिले आहे. ज्यावेळी ऑक्सिजनसाठी आम्ही तडफडत होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस कुठे गेले होते. जेव्हा सर्वांनी धारावी पॅटर्न जगाने स्वीकारला तेव्हा फडणवीस, त्यांचे चमचे आणि पालिकेतील पदाधिकारी कुठे गेले होते. कोरोनाच्या काळात तुम्ही काय केले हे सर्वांनी पाहिले आहे. तुम्ही सर्व आर्थिक मदत पीएम केअर फंडाला दिली. त्यावरून तुम्हाला फक्त दाढी कुरवळायची काळजी आहे, असा टोला जगताप यांनी लगावला. जनता समजून गेली आहे. नाशिकमध्ये हेच फडणवीस गेले होते. तेव्हा त्यांना तेथील जनतेने परत पाठवले आहे. फडणवीस यांनी मुंबईत फिरावे आणि आपल्या ८४ जागा वाचवून दाखवावे, असे आवाहन जगताप यांनी केले.

वॉर्डची पुनर्रचना करा -

मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दर ५ वर्षांनी होते. २०१७ मध्ये पालिकेच्या निवडणूकीपूर्वी २०१६ मध्ये भाजपा सरकराने मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डची पुनर्रचना केली. त्यात सुमारे ५० वॉर्डची पुनर्रचना करताना भाजपाला फायदा होईल, याची काळजी घेण्यात आली होती. यामुळे ३२ नगरसेवक असलेल्या भाजपाचे २०१७ च्या निवडणुकीत ८२ नगरसेवक निवडून आले होते. आता पुन्हा पालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाला असल्यास पुढील वर्षी फेब्रुवारीत पालिका निवडणूक होतील. त्याआधी भाजपने केलेल्या ४५ वॉर्डची पुन्हा पुनर्रचना करावी, अशी मागणी पालिकेतील विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

भाजपाच्या शेलार यांना रवी राजा यांचे प्रतित्यूर -

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुंबईतील 30 वॉर्ड जे शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. कायदा आणि कोरोनाचा विचार करुन निवडणुका घ्या, भाजपा तयार आहे, असे वक्तव्य केले आहे. यावर बोलताना शेलार यांनी भाजपाचे ३० जागा आहेत, हे स्पष्ट केले आहे. इतर जागा त्यांनी वॉर्ड पुनर्रचनेतून जिंकल्या आहेत. या जागांवर आधी शिवसेनेचे नगरसेवक जिंकून यायचे, त्या जागा भाजपाने जिंकल्या कशा, असा सवाल रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसला भाजपाचे आव्हान -

रवी राजा यांनी निवडणूक आयोगाकडे वॉर्ड पुनर्रचना करण्यासाठी पत्र दिले आहे. २०१६ मध्ये वॉर्ड पुनर्रचना तात्कालीन शिवसेनेचे महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्या समोर झाली आहे. रवी राजा यांनी पत्र दिले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. त्यांनी पालिकेच्या २२७ वॉर्डाची पुनर्रचना करावी आणि काँग्रेसच्या आता असलेल्या ३० जागा जिंकून आणावे, असे खुले आव्हान भाजपचे प्रवक्ते व नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट दिले आहे.

हेही वाचा - शिक्षकांसाठी खुशखबरः आता आयुष्यभर राहिल TET सर्टिफिकेटची वैधता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.