ETV Bharat / city

जेपी नड्डा यांच्यावरील हल्ल्याचे मुंबईत पडसाद; भाजपाची निदर्शने

author img

By

Published : Dec 10, 2020, 7:41 PM IST

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर आज बंगाल दौऱ्यावर असताना दगडफेक झाली. या हल्ल्याचा भाजपाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात येत आहे.

mumbai BJP against Mamata Banerjee
जेपी नड्डा यांच्यालरील हल्ल्याचे मुंबईत पडसाद; भाजपाची निदर्शने

मुंबई - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर आज बंगाल दौऱ्यावर असताना दगडफेक झाली. या हल्ल्याचा भाजपाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात येत आहे. मुंबईत सायन किंग सर्कल परिसरात आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी निषेध करत निदर्शन केले. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. जेपी नड्डा हे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या क्षेत्रात जात होते. यावेळी जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या वाहनांच्या ताफ्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.जेपी नड्डा यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांचा पुतळा व त्यांच्या नेत्यांची छायाचित्रे घेऊन त्याला काळे फसण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुंबईतील सायन किंग सर्कल परिसरात पोलिसांनी त्यांना आडवून शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र तरीही कार्यकर्त्यांनी न ऐकल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून पुतळा हिरावून घेतला. आणि काही जणांना ताब्यात घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.