मुंबई - मुंबईतील भाजपाचे आमदार आणि महापालिका प्रभारी अतुल भातखळकर यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार ( Police Complaint Against Mamata Banerjee ) दिली आहे. भातखळकर यांनी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल ट्रायडंटमध्ये ममता यांच्यावर राष्ट्रगीताचा अवमान केला आहे. त्या राष्ट्रगीताच्या सुरुवातीच्या काही क्षणात खाली बसलेल्या होत्या असा आरोप ( Atul Bhatkhalkar Allegation on Mamata ) तक्रारीत केला आहे.
भातखळकरांचा ममता बॅनर्जीवर आरोप -
ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे. ममता यांनी बसून राष्ट्रगीत गायले आणि 4-5 ओळी गायल्यानंतर त्या उठल्या आणि राष्ट्रगीत म्हणू लागल्या. याबाबतचा अपूर्ण राष्ट्रगीताचा व्हिडिओ पोलिसांना दिला आहे.
ममता बॅनर्जी दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर -
ममता बॅनर्जी दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ममता बॅनर्जी यांनीही येथे बॉलिवूड कलाकारांची भेट घेतली. या दौऱ्यावर केंद्रातील मोदी सरकार ममतांच्या निशाण्यावर होते.
हेही वाचा - Sanjay Raut Allegations On BJP : …तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत; संजय राऊतांनी सुनावले