मुंबई - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना (Mumbai Corona) विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी गेले वर्षभर लसीकरण मोहीम (Corona Vaccination in Mumbai) सुरू आहे. सरकारने दिलेल्या टार्गेटनुसार मुंबईत १८ वर्षावरील सर्व ९२ लाख ३६ हजार नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. यामुळे मुंबईत १०० टक्के लसीकरण पूर्ण (Mumbai fully Vaccinated) झाल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (BMC additional commissioner Suresh Kakani) यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण - मुंबईत मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार सूरु झाला. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा रोखण्यात पालिका प्रशासन, राज्य सरकारला यश आले आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सर्वात महत्वाची काम लसीने केले आहे. यामुळे तिसऱ्या लाटेत दिवसाला २१ हजार रुग्ण आढळून आले तरी त्यांना रुग्णालयात दाखल न करताच ते घरी बरे झाले आहेत. मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या दरम्यान आरोग्य, फ्रंट लाईन कर्मचारी, ६० वर्षावरील वयोवृद्ध, ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेले, १८ ते ४४ वय असलेले, १५ ते १७ वयोगटातील मुले, १२ ते १४ वयोगटातील मुले असे टप्प्याटप्याने लसीकरण करण्यात आले.
दुसऱ्या डोसचे उद्दिष्ट साध्य - मुंबईत लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर सर्व पात्र नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट साध्य केले होते. सरकारने दिलेल्या उद्दिष्टांनुसार १०० टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. मात्र त्यानंतरही मुंबई बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढल्याने लसीचा दुसरा डोस १०० टक्के नागरिकांना देण्याचे उद्दिष्ट साध्य होत नव्हते. मात्र घरोघरी दिलेल्या भेटी, मोबाईल लसीकरण आणि जनजागृती यामुळे १०० टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
आतापर्यंत झालेले लसीकरण -
पहिला डोस - १ कोटी ६ लाख ७८ हजार २५
दुसरा डोस - ९४ लाख ९२ हजार ५११
बूस्टर डोस - ४ लाख १५ हजार ५०५