मुंबई : शहरातील सर्वात जुने असलेले भाऊ दाजी लाड ( Bhau Daji Lad Museum ) हे संग्रहालय आज दीडशे वर्ष पूर्ण करत आहे. हे संग्रहालय जवळपास शंभर वर्षापूर्वी व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय म्हणून ओळखले जात होते. 1975 मध्ये मुंबईचे पहिले वैद्यकीय पदवीधर शहराचे पहिले भारतीय शरीफ आणि संयुक्त संग्रहालय समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने त्याचे नामकरण करण्यात आले. आणि याला सचिव भाऊ दाजी लाड यांचे नाव देण्यात आले.
हेही वाचा - Raj Thackeray Tweet : अक्षय्य तृतीयेला महाआरती करू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
कधी भेट द्याल ?
या संग्रहालयात भारतातील अनेक सुंदर हस्तकला संग्रहित करण्यात आले आहेत. या संग्रहालयात कला, हस्तकला तसेच मुंबईचा इतिहास जपण्यात आला आहे. संग्रहालय पाहण्यासाठी तुम्ही कधीही येऊ शकता. परंतु, ऑक्टोबर नंतरचा काळ संग्रहालयाला भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे. कारण यावेळी उष्णता थोडी कमी असते.
कोण होते डॉ. भाऊ दाजी लाड ?
डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचे मूळ नाव रामकृष्ण लाड असे होते. ते मूळचे गोव्याचे राहणारे 1922 मध्ये एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. 832 मध्ये लाड मुंबईला आले. इथे मुंबईत एका बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेत मुंबईच्या गव्हर्नरने लाड यांना खेळताना पाहिले व त्यांची प्रतिभा ओळखली. त्यानंतर त्यांना मुंबईतील प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. इथून त्यांनी वैद्यक शास्त्राचे शिक्षण घेतले आणि ते पुढे प्रसिद्ध डॉक्टर बनले. भारतात आणि जगात कुष्ठरोगावर उपचार करणे ही त्यांची सर्वात मोठी कामगिरी होती.
संग्रहालयाची वैशिष्ट्य
या संग्रहालयात तुम्हाला मुंबईचा इतिहास पाहायला मिळेल. ज्या सात बेटांपासून मुंबई तयार झाली ती सात बेट नेमकी कशी होती ? याचा नकाशा आराखडा येथे ठेवण्यात आलेला आहे. त्याच प्रमाणे पूर्वी मुंबईत राहणाऱ्या लोकांचा पोशाख कसा होता ? त्यांचे राहणीमान कसं होतं ? याची इत्थंभूत माहिती तुम्हाला या संग्रहालयात पाहायला मिळेल. इतकंच नाही तर मुंबईत ज्या राजांनी इथं राज्य केलं त्यांचे सैन्य कसं होतं ? त्यांचे पोशाख कसे होते ? याची देखील माहिती तुम्हाला या संग्रहालयात पाहायला मिळते. त्यामुळे, मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या संग्रहालयाला प्रत्येकाने एक वेळ तरी नक्कीच भेट दिली पाहिजे. ज्यातून तुम्हाला मुंबईच्या इतिहास समजून घेता येईल.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या टीकेला अमृता फडणवीसांचा खोचक टोला, 'आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीश...'