ETV Bharat / city

Politics In Maharashtra : वडिलांनंतर मुलांच्या हाती पक्षाची धुरा, काही मुलांनी सांभाळला तर काहीजण देतायत अस्तित्वाची लढाई - घराणेशाही राजकारण

आपल्या देशाच्या राजकारणाला घराणेशाही (Dynastic politics) ही काय नवी नाही. सुरुवातीला हा आरोप फक्त काँग्रेस याच पक्षावर होत होता. मात्र, जर आपण जरा इतिहासात डोकावलं (Histori Shivasena) तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेस व्यतिरिक्त इतर असे अनेक पक्ष आहेत ज्यांमध्ये ही घराणेशाही दिसून येते. तर, आज आपण बघणार आहोत असे कोणते पक्ष आहेत ज्यामध्ये वडिलांकडून पक्षाची धुरा मुलांकडे आली आणि काय आहे सध्याची राजकीय पक्षांची स्थिती.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jul 12, 2022, 5:16 PM IST

मुंबई : आपण जरा इतिहासात डोकावलं तर आपल्या लक्षात येईल की काँग्रेस व्यतिरिक्त इतर असे अनेक पक्ष आहेत. ज्यांमध्ये ही घराणेशाही दिसून येते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरुवातीला काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करत काँग्रेस मधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना (Establishment of NCP) केली. मग हाच घराणेशाहीच्या आरोपांचा धागा पकडत भाजपने काँग्रेसला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. नंतर हाच राग काँग्रेस विरोधात सर्वांनी आळवला. सध्याची काँग्रेसची स्थिती काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र, काँग्रेससारखी स्थिती इतिहासात काही पक्षांची झाली. तर, काही पक्षा आज याच मार्गावर आहे. उदाहरणार्थ शिवसेना.

1) काँग्रेस - देशाच्या राजकारणातील सर्वात जुना पक्ष म्हणजे काँग्रेस. स्वातंत्र्य चळवळीतील एक संघटन म्हणून 28 डिसेंबर 1885 मध्ये या काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर देश स्वतंत्र झाला मग याची सूत्र मोतीलाल नेहरू यांच्याकडे आली. नेहरू किंवा गांधी घराण्याने काँग्रेसची स्थापना केलेली नाही. तरीसुद्धा दोन वेळा मोतीलाल नेहरू यांनी काँग्रेसचे सर्वे सर्व म्हणून काम पाहिलं. त्यानंतर काँग्रेसची सूत्र तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आली. नेहरूंच्या मृत्यूनंतर काँग्रेस काँग्रेसचे संघटन नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याकडे आलं.

इंदिरा गांधी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी - इंदिरा गांधींच्या नेतृत्व काळात काँग्रेसमध्ये काही इतिहासात नोंद घेण्यासारख्या काही घटना घडल्या. कारण, याच काळात आता शिवसेनेत जशी बंडखोरी झाली त्याचप्रमाणे बंडखोरी झाली होती. आणि, खुद्द इंदिरा गांधींचीच काँग्रेस मधून हकालपट्टी करण्यात आली होती. ही हकालपट्टी करणारी नेते सुद्धा इंदिरा गांधी यांचे निकटवर्ती होते. यामध्ये मोरारजी देसाई, कामराज असे तगडे नेते होते. मात्र, इंदिरा गांधींनी मागे न हटता संपूर्ण देश पिंजून काढला. त्यानंतर निवडणूक आयोगाने इंदिरा गांधींना गाय वासरू हे निवडणूक चिन्ह दिल.

'गाय वासरू नका विसरू'- इंदिरा गांधी यांनी या भारत दौऱ्यात संपूर्ण देशभर आपल्या पक्षाचे चिन्ह पोहोचवलं होतं. त्यावेळी एक घोषणा प्रचलित झाली होती. ती म्हणजे 'गाय वासरू नका विसरू' मग काहीच वर्षात निवडणुका लागल्या आणि या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी यांनी एक हाती सत्ता स्थापन केली. सर्वाधिक जागा इंदिरा गांधी यांच्या पक्षाच्या निवडून आल्या होत्या. मग याच बंडखोर नेत्यांना नाईलाजास्तव आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांना शरण यावं लागलं होतं.
त्यानंतर काहीच वर्षात इंदिरा गांधी यांच्या अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. मग काँग्रेसची सूत्र ही राजीव गांधी यांच्याकडे आली. राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. त्यानंतर काँग्रेसचे सूत्र पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडे आली त्यांच्या नेतृत्वानंतर हे सूत्र सिताराम केसरी यांच्याकडे गेली. हे दोन नेते वगळता या नेत्यानंतर काँग्रेसचे सूत्र पुन्हा गांधी घराण्याकडे आली आणि ती सोनिया गांधी यांनी स्वीकारली.

आजची काँग्रेसची अवस्था - सोनिया गांधी नंतर काँग्रेसचे सूत्र काही काळ राहुल गांधी यांनी देखील सांभाळली. मात्र, निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी देखील यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आजच्या घडीला काँग्रेसकडे अधिकृत असा अध्यक्ष नाही. मात्र तरीदेखील काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपल्या पक्षाचे नेतृत्व मानतात व त्यांच्याच निर्णयाखाली सध्या हे काँग्रेसचे नेते काम करत आहेत. आजच्या घडीला राहुल गांधी आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्याची लढाई देत आहेत.

2) समाजवादी पार्टी - काळ होता 1992 चा. या काळात मुलायम सिंग यादव हे जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्याला नाव दिलं समाजवादी पार्टी. मुलायम सिंग यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये आपलं पक्ष संघटन वाढवलं व पक्ष तळागाळात पोहोचवला. याच जोरावर ते दोन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील झाले. मुलायम सिंग यांच्याच नेतृत्व काळात अखिलेश यादव देखील मुख्यमंत्री झाले. 2017 साली समाजवादी पार्टीची सूत्र मुलायम सिंग यांनी त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांच्याकडे सुपूर्त केली. अखिलेश यांच्या नेतृत्वात 2017, 2019 आणि 2022 च्या निवडणुका झाल्या यातील 2017 व 2019 च्या निवडणुकांमध्ये अखिलेश यांना दारुण पराभव सहन करावा लागला होता. संपूर्ण उत्तर प्रदेश मध्ये त्यांचे फक्त एकूण 47 आमदार निवडून आले होते. त्यावेळी अखिलेश यांच्या नेतृत्वावर त्यांच्याच पक्षातील अनेकांनी प्रश्नचिन्ह उभं केलं तर काहींनी पक्षाला सोडचिठ्ठी देखील दिली.

2022 निवडणुका अखिलेश चमकले - मात्र, 2022 च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांनी संपूर्ण उत्तर प्रदेश पिंजून काढला. तळागाळातील लोकांच्या भेटी घेतल्या. या काळात अखिलेश यादव हे नाव देशभर गाजत होतं. अखिलेश यादव यांच्या या मेहनतीचा परिणाम देखील निवडणुकीच्या निकालात दिसला. फक्त 47 आमदारांपुरतं राहिलेला पक्ष तब्बल 111 आमदारांचा झाला. तब्बल 11 आमदार निवडून आणत अखिलेश यादव यांनी आपलं नेतृत्व दाखवून दिलं.

3) द्रविड मुंनेत्र कडघम (DMK)
द्रविड मुंनेत्र कडघम तमिळनाडूच्या राजकारणातील हा एक महत्त्वाचा पक्ष. या पक्षाची स्थापना सी. एन. अण्णादुरई यांनी केली. त्यांच्या मृत्यूनंतर डीएमकेच्या प्रमुख एम करुणानिधी झाल्या. एम करुणानिधी यांनी पक्ष संघटन इतकं वाढवलं की त्या सलग चार वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांची लोकप्रियता देखील इतकी अफाट होती की करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण तमिळनाडू दुःखात बुडाला होतं. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर पक्षाची सूत्र त्यांचे पुत्र एम के स्टालिन यांच्याकडे आली.

2014 चा दारुण पराभव - एम करुणानिधी हयात असतानाच त्यांचे नेतृत्वात 2014 सली या पक्षाला अतिशय दारुण पराभव सहन करावा लागला होता. यावेळी या पक्षाला एकही जागा जिंकता आली नव्हती. करुणानिधी यांच्या अस्तित्वात इतका दारुण पराभव झाल्याने अर्थातच पक्षांतर्गत नाराजी वाढू लागली. अनेकांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. यात करुणानिधींचे अनेक जवळचे सहकारी देखील होते.

स्टॅलिन नेतृत्वात 38 जागा - 2018 साली करुणानिधी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पक्षाची सूत्र त्यांचे पुत्र एम के स्टालिन यांच्याकडे आली. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डी एम के ने 2019 च्या विधानसभा निवडणूक लढवली. 2018 लाच करुणानिधी यांचे निधन झाल्याने या निवडणुकांमध्ये काहीसं भावनिक वातावरण देखील होतं. या भावनिक वातावरणात या पक्षाला फक्त 38 जागा जिंकता आल्या. याच मुद्द्यामुळे स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रश्नचिन्ह देखील उभा केलं होतं.

स्टॅलिन यांच्या नेतृत्वात एक हाती सत्ता -पक्षांतर्गत नाराजीला फारसं महत्त्व न देता स्टॅलिन यांनी संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला. त्याचा परिणाम 2021 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये दिसून आला. कारण 2021 साली स्पेलिंग यांच्या नेतृत्वात या पक्षाने तमिळनाडूत तब्बल 159 विधानसभेच्या जागा जिंकल्या व तमिळनाडूत आपलं एक हाती सरकार स्थापन केलं. त्यामुळे जी लोकं स्पेलिंग यांच्या नेतृत्वावर नाराज होऊन दुरावली होती ती पुन्हा एकदा स्टॅलिन यांच्या छायेखाली आली.

4) युवाजन श्रमिका रिथु काँग्रेस पार्टी (YSR Congress)
काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे आंध्र प्रदेशचे राजशेखर रेड्डी. राजशेखर रेड्डी यांनी आंध्र प्रदेश पिंजून काढत तळागाळात काँग्रेस पोहोचवली. मात्र, राजशेखर यांचं 2009 साली अकाली निधन झालं आणि आंध्र प्रदेश मधील काँग्रेसच्या धबधबा देखील काहीसा कमी झाला. याला कारण ठरले राज खुद्द राजशेखर यांचे पुत्र जगन मोहन रेड्डी.

काँग्रेसशी फारकत - जगन मोहन यांनी वडिलांच्या मृत्यूनंतर काँग्रेस सोबत न जाता वडिलांच्या नावाने वाय एस आर काँग्रेस ची स्थापना केली. पक्षाच्या स्थापनेनंतर 2014 साली विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र, या निवडणुकांमध्ये त्यांना फारसं काही यश आलं नाही. 2014 साली रेड्डी यांच्या पक्षाने विधानसभेच्या 70 जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांना काही सरकार स्थापन करता आलं नाही. मात्र, 2019 सालच्या विधानसभेत त्यांनी तब्बल 151 जागा जिंकत आंध्र प्रदेश मध्ये एक हाती सत्ता मिळवली व जगन मोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे 17वे मुख्यमंत्री झाले.

5) शिवसेना - एकेकाळी निष्ठावान कार्यकर्ते, मजबूत पकड असलेला पक्ष अशी शिवसेनेची ओळख होती. मात्र, सध्याच्या घडीला या पक्षात उभी फूट पडल्याने शिवसेनेची सुत्र नेमकी कुणाकडे जाणार ? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र, हे झालं आत्ताच. याआधी आपण या पक्षाची पार्श्वभूमी घेतली पाहिजे. 19 जून 1966 ला या पक्षाची स्थापना झाली. चळवळीतून हा पक्ष उभा राहिला. बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या चेहरा.

उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होत राज ठाकरे यांच बंड - 2003 साली बाळासाहेब ठाकरे यांनी पुत्र उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात आणलं. याआधी राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या जोडीला खांद्याला खांदा लावून पक्षाचं काम करत होते. यावेळी चर्चा होते की बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षाचे नेतृत्व हे राज ठाकरे असतील. मात्र, 2003 सालीच बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष केलं आणि पक्षाची धुरा त्यांच्या हाती सुपूर्द केली. 2003 नंतर काही वर्ष उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली राज ठाकरे यांनी काम केलं. मात्र, अखेर मार्च 2006 मध्ये राज ठाकरे यांनी बंड करत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका - उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेने 2004, 2009, 20-14 आणि 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या. यात शिवसेनेला चांगलं यश देखील आलं. या निवडणुकांमध्ये 2014 ची निवडणूक वगळता शिवसेना भाजप युतीत या निवडणुका झाल्या होत्या. मात्र, 2014 साली भाजप व शिवसेना स्वतंत्र लढले होते. स्वतंत्र लढले असले तरी 2014 मध्ये शिवसेना व भाजपने सत्ता स्थापन केली व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले सत्तेत असून देखील या दोघांमधील वाद वारंवार समोर येत होते. अखेर 2019 च्या विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुका या दोन्ही पक्षांनी युतीत लढवल्या. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांनी दिलेल्या वचनानुसार अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी केली. अखेर ही युती तुटली व महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. खुद्द पक्षप्रमुखांकडेच मुख्यमंत्रीपद आल्याने शिवसेना आपलं प्रस्थ निर्माण करेल असं वाटत होतं. मात्र, शिवसेनेचे निष्ठावंत अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत तब्बल 40 आमदार फोडले आणि शिवसेनेत उभी फूट पडली.

आजची स्थिती- आजच्या घडीला एका बाजूला शिंदे गटाचे 40 आमदार तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या गटाचे 16 आमदार आहेत. त्यात शिवसेनेची सर्व सूत्र उद्धव ठाकरे यांच्याकडे असताना आता शिंदे गट आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा करत आहे. त्यामुळे धनुष्यबाण आमचाच, आम्ही खरी बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाच्या दाव्यामुळे उद्धव ठाकरे हे सध्या आपल्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहेत.

पूर्ण पक्ष रिकामा- या संदर्भात राजकीय विश्लेषकांची काय मतं आहेत ? हे जाणून घेण्यासाठी जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "अनेक वेळा प्रतीकुल परिस्थितीतून एखाद्या माणसाचं अस्तित्व अधिक झळाळून येतं. अशी परिस्थिती शिवसेनेला कधीही पाहायला मिळाले नव्हती. अगदी बाळासाहेब ठाकरे यांना देखील पाहायला मिळाली नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात देखील अनेक जण पक्ष सोडून गेले असले तरी जवळजवळ पक्ष रिकामा होणे अशी परिस्थिती तेव्हा कधीही निर्माण झाली नव्हती. त्यामुळे आता शिवसेनाही अत्यंत सर्वसामान्य शिवसैनिकाची राहिलेली आहे. तेव्हा आता या सर्वसामान्य शिवसैनिकाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थिती विरोधात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी लढायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे भविष्यात जर शिवसेनेला पुन्हा उभारी मिळाली तर ती दीर्घकाळ टिकणारी असेल."

शिवसेनेची सुस्ती उडाली- "वर्षानुवर्षाच्या सत्तेमुळे अनेक राजकीय पक्षांना सुस्ती येते. अगदी काँग्रेसचे सुद्धा तेच झालं. त्यामुळे आज काँग्रेसची अवस्था काय आहे हे आपण बघतो आहे. अगदी हेच शिवसेनेबाबत घडलं. मागची काही वर्ष शिवसेना सत्तेत असल्याने ते निष्काळजी होते. सत्तेमुळे काँग्रेस प्रमाणे शिवसेनेला देखील सुस्ती आली होती. मात्र, आता या बंडामुळे शिवसेनेची ही सुस्ती उडालेली दिसते. आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे धडधडून कामाला लागले आहेत. आपण बघतोय ते सतत प्रत्येक जिल्ह्याच्या बैठका आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. आता या प्रतिकूल परिस्थितीतून शिवसेना सर्वसामान्यांची जोडली जाईल आणि हाच सामान्य माणूस शिवसेनेला पुन्हा उभारी देऊ शकतो." अशी प्रतिक्रिया जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी दिली आहे.

हेही वाचा : Mukhtar Abbas Naqvi: लोकसंख्येचा स्फोट हा कोणत्याही धर्माची नसून ती देशाची समस्या आहे -नकवी

हेही वाचा : MLC Opposition Leader Issue : विधानपरिषद विरोधीपक्ष नेते पदासाठी रस्सीखेच!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.