मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( Maharashtra Public Service Commission ) घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ( State Service Pre-Examination 2021 ) ही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही वृत्तपत्रामध्ये आज (सोमवारी) प्रसिद्ध झालेली होती. या वृत्तामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र, यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण देत हे माहिती चुकीची असून २३ जानेवारी २०२२ रोजी नियोजित वेळेनुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ होणार असल्याची माहिती दिली आहे.
- 'अफवेवर विश्वास ठेवू नका'
शासकीय सेवेतील विविध पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी भरती प्रक्रिया राबवत असते. ही परीक्षा दिल्यानंतर अनेकांना सरकारी अधिकारी होण्याची संधी मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आयोगाचा संकेस्थळावर सतत तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करताना अनेक अडचणी येत आहे. काल तर महाराष्ट्र लोकल सेवा आयोगाने येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रोसेस तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आज तर, चक्क २३ जानेवारी २०२२ रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ ही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र, यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्टीकरण देत हे माहिती चुकीची असून २३ जानेवारी २०२२ रोजी नियोजित वेळेनुसार राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ होणार असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय कोणतेही अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सुद्धा आयोगाने विद्यार्थ्यांना केले आहे.
- 390 पदांसाठी होणार परीक्षा
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे शासकीय सेवेतील भरती प्रक्रिया रखडली होती. याचबरोबर शासकीय सेवेसाठी परीक्षा सुद्धा होऊ शकल्या नाहीत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. ही राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 2 जानेवारी 2022 ला घेण्याचे ठरवले होते. मात्र, या परीक्षेत अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे परीक्षेस बसण्याची संधी हुकली आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना एक संधी मिळावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा 23 जानेवारी 2022 घेण्याचे सुधारी वेळापत्रक जाहीर केले आहेत.
हेही वाचा - शाळा संघटना आक्रमक, मेसाचा इशारा तर, शाळा सुरू केल्याचा मेस्टाचा दावा