ETV Bharat / city

MP Shewale Letter to Thackeray : भाजपाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या; खासदार शेवाळेंचे उद्धव ठाकरेंना पत्र

author img

By

Published : Jul 5, 2022, 8:16 PM IST

रालोआच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा खासदार शेवाळे यांनी पत्रात केली आहे. ( MP Shewale Letter to Thackeray ) ( MP Rahul Shewale letter For Support BJP presidential candidate )

MP Shewale Letter to Thackeray
खासदार शेवाळेंचे उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई - आदिवासी समाजातील सक्षम आणि कर्तृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली ( MP Rahul Shewale letter For Support BJP presidential candidat ) आहे. याविषयीचे पत्र खासदार शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भवनात भेट घेऊन दिले आहे. यामुळे शेवाळे शिंदे यांच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. ( MP Rahul Shewale Letter to Shiv Sena Chief Uddhav Thackeray )

MP Shewale Letter to Thackeray
खासदार शेवाळेंचे उद्धव ठाकरेंना पत्र

खासदार शेवाळेंची मागणी - रालोआच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या संवेदनशील सामाजिक आणि यशस्वी राजकीय वाटचालीची प्रशंसा खासदार शेवाळे यांनी पत्रात केली आहे. तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत, महाराष्ट्राची कतृत्त्ववान महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान व्हावी, याच हेतूने माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दर्शविला होता. तसेच दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कर्तृत्त्वाचा आदर करत त्यावेळी देखील शिवसेनेने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. हीच परंपरा कायम ठेवत, आदिवासी समाजातील एका कर्तृत्त्ववान महिलेचा सन्मान करण्यासाठी शिवसेना पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा. त्यासाठी पक्षाच्या सर्व खासदारांना आदेश द्यावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी पक्षप्रमुखांकडे केली आहे.

खासदार शिंदेंच्या मार्गावर ? दरम्यान महाविकास आघाडीचा पाठिंबा सिन्हा यांना असताना शेवाळे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने आता शेवाळेही शिंदे यांच्या मार्गावर जाणार का? अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

हेही वाचा - Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohla : जीवन धन्य करणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; जाणून घेऊया इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.