मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांनी आज शुक्रवारी संभाजी ब्रिगेड संघटनेशी Shivsena Sambhaji Brigade Organization Alliance युती केली आहे. याच मुद्यावरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navneet Rana criticized Uddhav Thackeray यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray कोणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाही. त्यांच्यामध्ये दम नाही. तसे असते तर ते घरी बसले नसते, अशी खोचक टीका खासदार नवनीत राणा Mp Navneet Rana यांनी केली आहे. त्या मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या.
'उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही' : माझे आणि उद्धव ठाकरेंचे व्यक्तीगत काही वाद नाही. शिवसेनेत बंड करून जे आमदार बाहेर पडले आहेत. ते स्वत:च्या हिंमतीवर बाहेर पडले आहेत. त्यांनी काही ना काही नाव कमवले आहे. संभाजी ब्रिगेडबाबत सर्वांच्या मनात आदर आहे. परंतु उद्धव ठाकरेंमध्ये दम नाहीये, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यात दम असता तर घरी बसले नसते, अशी टीका खासदार नवनीत राणांनी केली आहे.
'काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?' : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली, यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचे मी स्वागत करतो. आमची युती वैचारीक आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरु आहे. यालाच लोकशाही मानणारे लोक आता बेतालपणे बोलत आहेत. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय घेणारा असेल. त्यावर मी जास्त बोलणार नाही. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे, असे मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना आघाडीची घोषणा