ETV Bharat / city

एसटी चालक व वाहकांना उंदीर-घुशींचा चावा; खासदार अरविंद सावंतांची परिवहन मंत्र्यांकडे तक्रार ! - एसटी विश्रांतीगृहात उंदीर व घुशी सुळसुळाट बातमी

राज्यातील अनेक आगारातील विश्रांती गृहात बसविण्यात आलेल्या लाकडी किंवा लोखंडी खिडक्या जीर्ण झाल्यामूळे तुटलेल्या आहेत. खिडक्यांना लावण्यात आलेल्या काचा तुटलेल्या आहेत. त्यामूळे विश्रांतीगृहात उंदीर व घुशी राजरोसपणे दिवसा ढवळ्या फिरताना दिसतात त्याचप्रमाणे उंदीर व घुशीनी राहण्यासाठी मोठाली पिले देखिल केलेली असून रात्रीच्या वेळी उंदीर किंवा घुशी झोपलेल्या चालक व वाहकांना चावा देखिल घेतात, असे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

mp arvind sawant wrote a letter to transport minister arvind sawant on issue of st workers rest house
एसटी चालक व वाहकांना उंदीर-घुशींचा चावा
author img

By

Published : May 19, 2022, 12:45 PM IST

मुंबई - एसटी चालक व वाहक कर्मचाऱ्यांनी त्यांची नियोजित कामगिरी पार पाडल्यानंतर पुन्हा कर्तव्यावर जाईपर्यंत त्यांना पुरेशी विश्रांती मिळावी या हेतूने एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात चालक व वाहक विश्रांती गृहे बांधलेली आहे. परंतु,सर्वच आगारातील विश्रांतीगृहात सुविधा ऐवजी असुविधाच मोठ्या प्रमाणावर होत आहे. इतकेच नव्हे तर, काय एसटीचा विश्रांतीगृहात उंदीर व घुशी सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या वेळी झोपलेल्या एसटी चालक व वाहकांना चावा देखिल घेत असल्याची तक्रार खासदार अरविंद सावंत यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे तातडीने विश्रांती गृहातील सुविधा पुरविण्याबाबतचे निवेदन खासदार अरविंद सावंत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना दिले आहे.

काय आहे समस्या - खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, राज्यातील अनेक आगारातील विश्रांती गृहात बसविण्यात आलेल्या लाकडी किंवा लोखंडी खिडक्या जीर्ण झाल्यामूळे तुटलेल्या आहेत. खिडक्यांना लावण्यात आलेल्या काचा तुटलेल्या आहेत. त्यामूळे विश्रांतीगृहात उंदीर व घुशी राजरोसपणे दिवसा ढवळ्या फिरताना दिसतात त्याचप्रमाणे उंदीर व घुशीनी राहण्यासाठी मोठाली पिले देखिल केलेली असून रात्रीच्या वेळी उंदीर किंवा घुशी झोपलेल्या चालक व वाहकांना चावा देखिल घेतात. त्याचप्रमाणे खिडक्यांच्या काचा किंवा खिडक्यांच तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे मच्छरांचा त्रास देखिल कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. विश्रांती गृहातील आजूबाजूच्या परिसरात सांडपाणी व मैला बाहेर आल्यामूळे सभोवताली दुर्गंधी पसरते. त्याचप्रमाणे संडास व न्हाणीघर तुंबल्यामुळे चालक व वाहकांची प्रातविधी व आंघोळीची गैरसोय होत असते. पावसाळा सुरू झाल्यावर छत गळके असल्यामुळे विश्रांतीगृहात पाणीच पाणी होते. चालक व वाहकांना विश्रांती घेणे कठीण होते. काही विश्रांती गृहात तर ठेकणांचे साम्राज्य आहे, अशा ठिकाणी चालक व वाहकांना झोप येणे कठीण होते.

परिवहन मंत्र्यांकडे मागणी - महामंडळाच्या प्रत्येक आगारात चालक व वाहक कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या विश्रांतीगृहाचा उददेश चालक व वाहक कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती मिळावी व पुढील कामगिरी सहजतेने पार पाडता यावी यासाठी आहे. परंतु वर नमुद परिस्थितीचा विचार करता चालक व वाहकांना विश्रांतीगृहात विश्रांती तर सोडाच उलट त्यांना मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागतो. यांचा परिणाम म्हणजे अशा चालकांच्या हातून गंभीर अथवा प्राणांकित अपघात होतात, त्यामुळे सहाजिकच महामंडळाचे अर्थिक नुकसान होते. त्याचप्रमाणे महांडळाची प्रतिमा देखिल जनमानसात मलिन होते. त्यामुळे चालक व वाहक शारिरीक आरोग्य सुधारण्याकरीता तसेच मानसिक संतुलन राखण्यासाठी विश्रांती गृहात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे विश्रांती गृहातील सुविधा तातडीने पुरविण्याबाबत संबंधिताना आपण निर्देश देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.