मुंबई - विजय मल्ल्या, निरव मोदी सारखे पळून जात आहेत. तर दुसरीकडे एका राजकीय नेतृत्वावर दबाव टाकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकारांचा गैरवापर केला जातोय, अशा शब्दात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत ( MP Arvind Sawant ) यांनी भाजपावर ( BJP ) टीकेची बाण सोडले. न्यायव्यवस्था जिवंत असून आम्हाला न्याय मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांना 4 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार हल्लाबोल केला.
'किमान मनाची तरी लाज बाळगा' : प्रत्येक गोष्टीत अटक का करावे लागते. चौकशी करा आणि सोडून द्या. वर्षानुवर्ष कोठडी. हा काय प्रकार आहे. कायद्याच्या किती गैरवापर करायचा. जामीन घेणे हा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र सातत्याने दबाव टाकून लोकांना वाकवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जेपी नड्डा यांनी केलेले वक्तव्य हुकूमशाहीकडे नेणारे असल्याचेही अरविंद सावंत म्हणाले. सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना चार दिवसाची कोठडी सुनावली आहे. तसेच, राऊत यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. अलिबागची जमीन देखील ताब्यात घेतली आहे. एकीकडे विजय मल्ल्या, निरव मोदी सगळे पळाले आहेत. दुसरीकडे राजकीय नेतृत्वावर दबाव टाकला जातो. हा प्रकार चुकीचा आहे जनाची नाही, किमान मनाची तरी लाज बाळगा, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला.
राजस्थान आणि गुजराती मुंबईतून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते. या विधानावरूनही अरविंद सावंत यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले. राज्यपाल बोलले त्यावर जेपी नड्डा यांनी शिक्कामोर्तब केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावरून प्रत्युत्तर दिला आहे. मात्र जे पोटात होता ते पोटात आल्याचेही अरविंद सावंत म्हणाले.
हेही वाचा - Sanjay Raut to ED Custody : संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; वाचा, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद