ETV Bharat / city

प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने 'देवदूत' यंत्रणेचे काम बंद आंदोलन - Movement to stop work of 'angel' system

पुणे एक्सप्रेस'वे'वरील कोणत्याही आपत्कालीन स्थितीत सर्वप्रथम मदतीला येणारी एक्सप्रेस वे देवदूत यंत्रणा आहे. महामार्ग पोलीस व सुरक्षा यंत्रणेच्या निर्देशानुसार आयआरबी अंतर्गत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेत एकूण 67 जवान दिवस रात्र पाळीनुसार देवदूताचे काम करीत आहेत. मात्र, प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली गुरुवार (दि 28)ऑक्टोबरपासून सर्व 67 देवदूतांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने 'देवदूत' यंत्रणेचे काम बंद आंदोलन

author img

By

Published : Oct 29, 2021, 8:19 AM IST

मुंबई - पुणे एक्सप्रेस'वे'वरील कोणत्याही आपत्कालीन स्थितीत सर्वप्रथम मदतीला येणारी एक्सप्रेस वे देवदूत यंत्रणा आहे. महामार्ग पोलीस व सुरक्षा यंत्रणेच्या निर्देशानुसार आयआरबी अंतर्गत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेत एकूण 67 जवान दिवस रात्र पाळीनुसार देवदूताचे काम करीत आहेत. मात्र, प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली गुरुवार (दि 28)ऑक्टोबरपासून सर्व 67 देवदूतांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी मोठया प्रमाणावर अडचण

एक्सप्रेस वे वरील कोणताही अपघात किंवा अपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यावर मदतकार्य व आरोग्य विषय व अन्य साह्य करण्याची काम देवदूत यंत्रणा करते. ही संपूर्ण यंत्रणा आपल्या प्रलंबित मागण्यासाठी संपावर असल्याने अशा स्थितीत एक्सप्रेस वे वर एखादी अपघाताची घटना किंवा अन्य दुर्घटना व आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी मोठया प्रमाणावर अडचण निर्माण होणार आहे.

अति असुरक्षित व आपत्कालीन स्थितीत मदत कार्य करतो

याबाबत देवदूत टीमचे सदस्य रवींद्र जावळे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, एक्सप्रेस वे वर आम्ही 67 तरुण देवदूत म्हणून मागील अनेक वर्षे आयआरबी च्या माध्यमातून कार्यरत आहोत. 15 ते 18 हजार दरमहा पगार मिळतो. मागील पाच वर्षे कोणतीही पगार वाढ करण्यात आलेली नाही. बोनस किंवा अन्य कोणताही मोबदला मिळत नाही. अति असुरक्षित व आपत्कालीन स्थितीत मदत कार्य करतो. मात्र, विमा कवच किंवा अन्य कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही. या संदर्भात भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करूनही मागण्या मान्य करण्यात येत नसल्याने आम्ही सर्व देवदूत बेमुदत संपावर आहोत.

हेही वाचा - ..त्यामुळे आता ऊसतोड कामगारांची नोंदणी वेब पोर्टल व मोबाईल अ‍ॅपवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.