मुंबई मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या नियमांमध्ये विजेते अविवाहित असावेत आणि विजेतेपदाच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांचा दर्जा कायम राखला पाहिजे. मातांना देखील ऐतिहासिकदृष्ट्या वगळण्यात आले होते तसेच मिस युनिव्हर्स म्हणून काम करताना विजेत्यांना गर्भधारणा टाळणे आवश्यक आहे असा नियम होता. मिस युनिव्हर्स 2020 विजेत्या मेक्सिकोच्या आंद्रिया मेझाने नियम बदलाचे कौतुक केले आहे. मेझाने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की जसा समाज बदलतो आणि स्त्रिया आता नेतृत्वाच्या पदांवर विराजमान होत आहेत जिथे पूर्वी फक्त पुरुषच करू शकत होते, त्याचप्रमाणे स्पर्धा बदलून कुटुंबासह महिलांसाठी खुले होण्याची वेळ आली होती.
मेझाने सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांवर टीका केली आहे तीने म्हणले आहे की, ते लैंगिक आणि अवास्तव आहेत जे शक्य तितक्या मोठ्या प्रेक्षकांना आकर्षित करतील असा विजेता निवडण्याच्या त्यांच्या प्रयत्न आहे. काही लोक या बदलांच्या विरोधात आहेत कारण त्यांना नेहमी एकच सुंदर स्त्री पाहायची होती जी रिलेशनशिपसाठी उपलब्ध आहे, मेझा पुढे म्हणाली त्यांना नेहमी अशी स्त्री पहायची होती जी बाहेरून इतकी परिपूर्ण दिसते की ती जवळजवळ अगम्य आहे. पूर्वीची लैंगिकतावादी आहे आणि नंतरची अवास्तव आहे.
मिस युनिव्हर्स स्पर्धा युनायटेड स्टेट्ससह जगभरातील 160 हून अधिक प्रदेश आणि देशांमध्ये प्रसारित केली जाते. भारताच्या हरनाझ संधूला मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट देण्यात आला. पंजाबमधील हरनाझ संधूने इस्रायलच्या इलात येथे झालेल्या 70 व्या मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. हरनाज संधूच्या आधी, फक्त दोन भारतीयांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता- 1994 मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्ता.
विश्व सुंदरी स्पर्धा आता अधिक बदलू लागली आहे.काळानुसार आता ह्या स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल होत आहे. येत्या 2023 पासुन विश्व सुंदरी स्पर्धेत लग्न झालेल्या महिलां आणि मातांना देखील सहभागी होता येणार आहे.हा लग्न झालेल्या महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय आहे. तसेच आयोजकांनी आपल्या आयुष्यात जुनाट विचारातून प्रगतिशील विचाराकडे झेप घेतल्याचे हे लक्षण बोलले जात आहे. विश्वसुंदरी स्पर्धेमध्ये जर सहभागी महिला अविवाहित असली तर विश्वसुंदरी संदर्भातला दर्जा हा टिकून राहतो हा जो आयोजकांचा विचार होता तो विचार आयोजकांनी आता सोडला आहे.