ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 1092 नवे रुग्ण, 17 रुग्णांचा मृत्यू - मुंबईतील कोरोनाचे नवे रुग्ण

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू लागला आहे. त्याच प्रमाणेम मुंबईतील रुग्ण संख्येतही वाढ होऊ लागली आहे. आज मुंबईत हजाराहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

mumbai corona
मुंबईत कोरोनाचे रुग्ण
author img

By

Published : Nov 21, 2020, 10:37 PM IST

मुंबई - मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा रुग्ण संख्या आटोक्यात आली. मात्र आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेल्या पाच दिवसात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ होत झाली आहे. मुंबईत आज नव्या 1092 रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत आज (शनिवारी) कोरोनाचे 1092 नवे रुग्ण आढळून आले असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 15 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष तर 5 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 74 हजार 572 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 654 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1053 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 51 हजार 509 वर गेला आहे. सध्या मुंबईत 9 हजार 325 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुपटीचा कालावधी 280 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 280, दिवस तर सरासरी दर 0.25 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 362 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 3 हजार 929 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 17 लाख 57 हजार 666 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या
१६ नोव्हेंबर - ४०९
१७ नोव्हेंबर - ५४१
१८ नोव्हेंबर - ८७१
१९ नोव्हेंबर - ९२४
२० नोव्हेंबर - १०३१
२१ नोव्हेंबर - १०९२

कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.