ETV Bharat / city

मुंबईत 530 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 4 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत बुधवारी (दि. 8 सप्टेंबर) 530 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 47 हजार 608 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 16 हजार 4 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 25 हजार 247 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 3 हजार 895 सक्रिय रुग्ण आहेत.

v
v
author img

By

Published : Sep 8, 2021, 10:20 PM IST

Updated : Sep 12, 2021, 4:26 PM IST

मुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट आटोक्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. बुधवारी (8 सप्टेंबर) 530 नवे रुग्ण आढळून आले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

रुग्णसंख्येत वाढ

मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. त्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात घट झाली होती. 16 ऑगस्टला सर्वात कमी 190 रुग्णांची नोंद झाली. मात्र, गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला 300 रुग्ण आढळून येत होते. सप्टेंबरला रुग्णसंख्या चारशेवर गेली. आज 8 सप्टेंबरला 530 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 47 हजार 608 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा 16 हजार 4 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या 7 लाख 25 हजार 247 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 3 हजार 895 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 1 हजार 253 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेली एक झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे. तर रुग्ण आढळून आल्याने 50 इमारती सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी एकूण 95 लाख 51 हजार 541 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्णसंख्येत चढउतार

4 एप्रिलला 11हजार 163, 7 एप्रिलला 10 हजार 428, 1 मे रोजी 3 हजार 908, 9 मे रोजी 2 हजार 403, 10 मे रोजी 1 हजार 794, 17 मे रोजी 1 हजार 240, 25 मे रोजी 1 हजार 37, 28 मे रोरजी 929, 14 जूनला 529, 16 जूनला 830, 21 जूनला 521, 22 जूनला 570, 4 जुलैला 548, 5 जुलैला 489, 6 जुलैला 453, 13 जुलैला 441, 2 ऑगस्टला 259, 9 ऑगस्टला 208, 16 ऑगस्टला 190, 1 सप्टेंबरला 416, 2 सप्टेंबरला 441, 3 सप्टेंबर 422, 8 सप्टेंबरला 530 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यावर्षी 1 फेब्रुवारीला 328, 2 फेब्रुवारीला 334 तर 26 जुलैला 299, 16 ऑगस्टला 190 सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला
मुंबईत रुग्णसंख्या कमी असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी 18 ऑगस्टला 2 हजार 58 दिवस होता. आज 8 सप्टेंबरला हा कालावधी 1 हजार 253 दिवस इतका नोंदवण्यात आला आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी कमी झाला आहे.

हे ही वाचा - प्रदीप शर्मांनी घेतली होती मनसुखच्या हत्येची सुपारी!

Last Updated : Sep 12, 2021, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.