मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत आहे. आज राज्यात नव्या 8912 कोरोना रुग्णांची भर पडली असून 257 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 10373 जणांना रुग्णालयातून डिस्रार्च देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 132597 सक्रिय रुग्ण असून 5710356 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.76 टक्के एवढे झाले आहे.
मुंबईत 13 रुग्णांचा मृत्यू -
दरम्यान, मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. गुरुवारी (17 जून) 666, काल (18 जून) शुक्रवारी 762 तर शनिवारी (19 जून) 696 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 13 रुग्णांचा मृत्यू झाला असून 790 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 720 दिवसांवर पोहोचला आहे.
हेही वाचा - कोरोनाची तिसरी लाट दीड ते दोन महिन्यांत येणार- एम्सचा इशारा