मुंबई - ओमायक्रॉनचे रुग्णसंख्या ( Omicron In Maharashtra ) झपाट्याने वाढत असताना आता लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांनादेखील कोरोनाने ( Mumbai Police Covid Positive ) झपाटले आहे. मुंबईतील तब्बल 24 तासांत 95 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil Office ) यांच्या कार्यालयदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. त्यांच्या कार्यालयातील 20 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.
24 तासांत 95 पेक्षा अधिक कर्मचारी कोरोनाबाधित -
मुंबईकरांच्या सुरक्षितेसाठी दिवस-रात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कॉन्स्टेबलसह गेल्या 24 तासांत 95 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसातील एकूण 975 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' -
मुंबई पोलिसांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना रक्तदाब, मधूमेह तसेच इतर काही आजार असल्यास त्या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच 50 ते 55 वर्षांवरील पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी ड्युटी न लावण्याचे आदेशदेखील पोलीस महासंचालक विभागातर्फे देण्यात आले आहे. शक्य असल्यास कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याचेदेखील पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतदेखील मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गृह विभागाने कोरोनाच्या या दुसऱ्या लाटमध्ये खबरदारी घेत गृह विभागाने या सूचना पोलीस अधिकार्यांना दिल्या आहेत.
गृह मंत्रालयाचे कार्यालय कोरोनाचा विळख्यात -
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कार्यालय कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. सकाळी त्यांच्या कार्यालयात चार जणांना कोरोना झाल्याची माहिती आली होती. मात्र, आता ही संख्या वाढून तब्बल 21वर पोहोचली आहे. तसेच आणखी 15 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. वळसे-पाटील यांच्या सचिवालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. स्वतः दिलीप वळसे पाटील हे मात्र या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले आहेत का, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
हेही वाचा - Anil Deshmukh in Jail : अनिल देशमुख यांचा तुरुंगामधील वाढला मुक्काम; पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार