मुंबई आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असताना भाजप नेते मोहित कंबोज सध्या राष्ट्रवादीवर निशाणा साधून mohit kamboj twee आहेत. काल तीन ट्विटमधून इशारा दिल्यानंतर आता आज त्यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केले आहे. हर हर महादेव अब तांडव होगा असे ट्विट केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची आजच चौकशी होण्याची शक्यता NCP leader ED Probe आहे.
सध्या राज्यात ईडीच्या कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. विरोधीपक्षातील नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. नुकतेच शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना ईडीने अटक केली. त्यानंतर नेक्स्ट कोण? याचे उत्तर मोहित कंबोज यांनी भविष्यवाणी करणाऱ्या ट्विटमधून दिले आहे. कंबोज यांचे हे ट्विट राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवणारे mohit kamboj target NCP Leader आहे.
जेलवारीसाठी तयार रहा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मोठे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख व नवाब मलिक हे या अगोदरच ईडीच्या कारवाईने तुरुंगात आहेत. त्यातच आता या दोन नित्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार अशा आशयाचे ट्विट करत मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीवर सतत ट्विटरद्वारे हल्लाबोल केला आहे. काल केलेल्या ट्विटमध्ये माझे हे ट्विट सेव्ह करुन ठेवा, अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी आहे. लवकरच हा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा, असे सूचक इशारा देणारे ट्विट मोहित कंबोज यांनी केले. त्यांच्या या ट्विटने जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा तिसरा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे पुढे घडणाऱ्या घडामोडी कंबोज यांना आधीच कशा माहिती होतात असा प्रश्न विचारला जात आहे.
हर हर महादेव अब तांडव होगा मोहित कंबोज यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये, हर हर महादेव, अब तांडव होगा असे सांगितले आहे. तांडव याचाच अर्थ आता मोठे काहीतरी घडणार आहे. मग राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा यामध्ये समावेश आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा तिसरा नेता कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रावादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरू आहे. खुद्द शरद पवार यांच्यासह अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. कंबोज सुचवू पाहणारे राष्ट्रवादीचे मोठे नेते प्रफुल्ल पटेलच असल्याची जोरदार चर्चा आहे. असे असले तरी सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, विरोधी पक्ष नेते, अजित पवार यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा Monsoon Session शिवसेनेच्या ५५ आमदारांना उद्धव ठाकरे यांच्याकडून व्हिप जारी