मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी स्थानकातून रेल्वे प्रवाशाचा मोबाईल चोरी करून फरार होणाऱ्या (Stolen mobile and run) आरोपीस अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली (Accused arrested stole passenger mobile) आहे. अटक करण्यात (Mobile Thief Arrest Mumbai) आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद साबीर इरफान खान (23) असून तो जोगेश्वरी पश्चिमेला राहात आहे. आरोपीकडून दोन मोबाईल ताब्यात घेण्यात आले (Mumbai police seized Mobile) आहेत.
गर्दीचा फायदा घेत मोबाइल लंपास- जोगेश्वरी स्थानकातून मालाडच्या दिशेने घरी जाण्यासाठी विशाल दिलीप जेठालाल यांनी बोरिवली लोकल पकडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने गर्दीचा फायदा घेत आरोपीने मोबाईल लंपास करून धावत्या लोकल मधून उडी मारून फरार झाला. यासंबंधीची तक्रार फिर्यादीने अंधेरी रेल्वे पोलिसांकडे दिल्यानंतर तपासासाठी दोन पदके तयार करण्यात आली. सीसीटीव्हीच्या मदतीने व तांत्रिक बाबींचा तपास करून आरोपीचा शोध घेण्यात आला.
चोरटा पोलिसांच्या जाळ्यात- यानंतर अंधेरी रेल्वे पोलिसांनी आरोपीला जोगेश्वरी पश्चिम येथून अटक करून त्याच्याकडून चोरीचे दोन मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. सध्या आरोपी अंधेरी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असून पोलिस अधिक तपास करत आहे. आरोपीने यापूर्वी देखील अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केले असल्याचे अभिलेखावरून आढळून आल्याचे अंधेरी रेल्वे पोलिसांनी सांगितले.